मंगळवेढा - एस.टी बस न मिळाल्याने मोटर सायकलस्वारास हात करून शिकवणीस जाणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा गैरफायदा घेत तीला ज्वारीच्या पिकात नेवून केला अत्याचार. याप्रकरणी राजू चंद्रकांत राठोड(रा.बालाजीनगर) याला पोलिसांनी काही तासात सीसीटीव्ही फुटेज च्या साह्याने अटक करून पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले .न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे .
पोलिस सुत्रांनी दिलेली माहितीनुसार ,यातील अल्पवयीन पिडीत मुलगी दि.1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वा. शिकवणीसाठी मंगळवेढ्यात येण्यासाठी बस न आल्याने मुलीने तास चुकेल या भितीने सांगोल्याकडून मंगळवेढ्याकडे मोटर सायकलवर येणाऱ्या राजू राठोड यास हात केला .
मंगळवेढयात सोडण्याची विनंती केली. आरोपीने मुलीस शहरात नेण्याऐवजी बोराळे रोडवरील काळया शिवारात घेवून गेला . आणि तीच्यावर जबरी अत्याचार करून पुन्हा त्या मुलीला शहरातील शाळेजवळ आणून सोडले.
सदर मुलीने ही घटना तीच्या शिक्षिकेला सांगितल्यानंतर या घटनेला वाचा फूटली.आरोपीच्या शोधासाठी विविध चार पथके तैनात करण्यात आली.त्यासाठी सी.सी.टि.व्ही. फुटेज तपासण्यात येवून त्या आधारे खबर्यामार्फत शोध घेतल्यानंतर पहाटे 4.00 वा. ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.संशयीत आरोपी बालाजीनगर येथील मजुर काम करणारा असल्याची माहिती उघड झाली.
या घटनेचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरिक्षक मनिषा महाडिक या करीत आहेत.
मुलीला ज्या मोटर सायकलवरून नेले त्या मोटर सायकलवर पुढील बाजूस पोलिस व पाठीमागील नंबर प्लेटवर आई असे लिहिल्याने हा प्रकार पोलिसांनीच केला असल्याच्या संशयावरून मंगळवेढा काल दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होत्या.
घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव,वेळापूरच्या महिला डी.वाय.एस.पी,सोलापूरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक या घटनेचा शोध घेण्यासाठी मंगळवेढयात दाखल झाले. चार पदके नेमून पोलिसांनी काही तासात सीसीटीव्ही फुटेचा आधार घेत आरोपीचा आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांनी सुटकेचा निस्वास सोडलाया घटनेचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरिक्षक मनिषा महाडिक या करीत आहेत.
मुलीला ज्या मोटर सायकलवरून नेले त्या मोटर सायकलवर पुढील बाजूस पोलिस व पाठीमागील नंबर प्लेटवर आई असे लिहिल्याने हा प्रकार पोलिसांनीच केला असल्याच्या संशयावरून मंगळवेढा काल दिवसभर उलट सुलट चर्चा सुरू होत्या.
घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव,वेळापूरच्या महिला डी.वाय.एस.पी,सोलापूरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक या घटनेचा शोध घेण्यासाठी मंगळवेढयात दाखल झाले. चार पदके नेमून पोलिसांनी काही तासात सीसीटीव्ही फुटेचा आधार घेत आरोपीचा आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांनी सुटकेचा निस्वास सोडला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.