Solapur Crime: खळबळजनक! सोलापुरमधील मोदी स्मशानभूमीतून १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब; जादू टोण्याच्या संशय

Solapur Crime: सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्मशानभूमीत दफन करण्यात आलेल्या १० महिन्याच्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याच प्रकार समोर आला आहे.
Solapur Crime
Solapur CrimeEsakal
Updated on

सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्मशानभूमीत दफन करण्यात आलेल्या १० महिन्याच्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याच प्रकार समोर आला आहे. सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमीत हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने स्मशानभूमीत पोहोचून सबंधित बातमीचा तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांश वाघमारे (वय वर्षे १० महिने) असं मृत बाळाचे नाव आहे. प्रियांशला खेळताना दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान १४ जून रोजी त्याचा मृत्यू झाला होता.

Solapur Crime
Mandla Crime: फ्रीजमध्ये गोमांस ठेवल्याचा आरोप, बुलडोझरने 11 घरे केली जमीनदोस्त, नेमकं काय घडलं?

प्रियांशच्या कुटुंबियांनी त्याच्यावर शहरातील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले होते. आज रविवारी तिसऱ्या दिवसाचा विधी पार पाडण्यासाठी वाघमारे कुटुंबिय मोदी स्मशानभूमीत पोहचले. यावेळी त्यांना मृतदेह पुरलेल्या ठिकाणी एक खड्डा आढळून आला. प्रियांशचा मृतदेह उकरून नेला असावा, असा संशय वाघमारे कुटुंबियांना आला.

Solapur Crime
UPSC Student: गुगल मॅपमुळे UPSC परिक्षेपासून वंचित! 3 मिनीटं उशिराने पोहचल्यानं प्रवेश नाकारला, नेमकं काय घडलं?

त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. स्मशानभूमीतून मृतदेह गायब झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रियांशचा मृतदेह जादू टोण्याच्या प्रकारासाठी उकरून नेला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. सध्या पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे.

Solapur Crime
Uttar Pradesh Crime: आधी २ वर्षाच्या मुलाचा गळा चिरला नंतर जाळले, आईच्या नावाला काळिमा फासणारी घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.