Solapur Crime : यात्रेत महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयाच्या मंगळसूत्रावर चोरट्याने मारला डल्ला

देवीचे दर्शन घेताना संगीता रामगुडे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सव्वा लाख रुपयांचे मंगळसूत्र कोणीतरी काढून घेतल्याची त्यांना जाणीव झाली.
rbi use of 2000 notes for purchase of jewellery pune finance investment
rbi use of 2000 notes for purchase of jewellery pune finance investment esakal
Updated on

Solapur Crime - यात्रेत देवीचे दर्शन घेताना एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सव्वा लाख रुपयाचे मंगळसूत्र चोरल्याची घटना चिखली ता मोहोळ येथील मरीमाता यात्रेत घडली. या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

rbi use of 2000 notes for purchase of jewellery pune finance investment
Mumbai News : शासनाने ‘खड्डे आपल्या दारी’ उपक्रम सुरू करावा: मनसेची जोरदार टीका

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिखली गावची मरी माता देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी गावातील व्यवसाय व नोकरी निमित्त बाहेरगावी गेलेले गावकरी हमखास येतात.

सुतार दरा, कोथरूड, पुणे येथील रहिवाशी असलेल्या संगीता अश्रुबा रामगुडे वय 36 या ही यात्रेसाठी चिखली येथे आल्या होत्या शुक्रवार ता 7 रोजी दुपारी साडेबारा वाजता संगीता रामगुडे व त्यांचे कुटुंबीय हे दर्शनासाठी देवीच्या मंदिरात गेले होते.

rbi use of 2000 notes for purchase of jewellery pune finance investment
Mumbai News : आयकॉनिक डबलडेकर बस बाद होणार; 'बेस्ट'ने दिला जबरदस्त पर्याय

देवीचे दर्शन घेताना संगीता रामगुडे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सव्वा लाख रुपयांचे मंगळसूत्र कोणीतरी काढून घेतल्याची त्यांना जाणीव झाली.

मागे वळून पाहिले असता एक अनोळखी इसम पळून जाताना त्यांच्या निदर्शनास आला त्यावेळी संगीता या चोर चोर म्हणून ओरडल्या परंतु चोरटा गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी संगीता आश्रुबा रामगुडे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.