वटवटे : मोहोळ येथील एका शेतातील ऊसाच्या पिकामध्ये केलेली गांजाची लागवड पोलिसांनी उघडकीस आणली. पोलिसांच्या कारवाईत 44 किलो 130 किलो वजनाचे गांजासह एकूण 4 लाख 41 हजार 300 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना सोलापूर जिल्हयात अंमली पदार्थ विरोधी विषेश मोहिम राबवून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि अनिल सनगल्ले यांचे विशेष पथक नेमूण सदर पथकास कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कार्यालयात हजर असताना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, मौजे वटवटे (ता. मोहोळ) येथील शेतकरी आपल्या शेतातील ऊसाच्या पिकामध्ये गांजा सदृष्य वनस्पतीची लागवड केले असलेबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या बातमी प्रमाणे कारवाई करण्याकरिता वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक कारवाई करणेकामी कामती पोलीस ठाणे येथे जावून तेथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने व कामती पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांची मदत घेवून कारवाई करण्या करीता बातमीचे नमूद ठिकाणी नायब तहसिलदार लिना खरात, दोन शासकीय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा असे वाहनासह जावून बातमीप्रमाणे शेतातील ऊसामध्ये पोलीस अधिकारी,
अंमलदार यांचेसह पाहणी केली असता शेतातील ऊसाच्या पिकामध्ये ठिक ठिकाणी लहान मोठी गांजा सदृश्य झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. त्यावरून मिळून आलेली झाडे ही गांजा सदृश्य वनस्पती असल्याचे खात्री झाल्याने सदरची झाडे मुळासह उपटून काढून त्याचे सोबत आणलेल्या वजन काटयामध्ये वजन केले असता 44 किलो.130 किलो वजनाचे 4 लाख 41हजार 300 रू. किंमतीचे गांजा सदृश्य वनस्पती मिळून आले.
अंमली पदार्थ गुन्हयाचे कामी कामती पोलीस ठाण्याचे सपोनि अंकुश माने यांनी जप्त करून कारवाई केली आहे. सदरबाबत कामती पोलीस ठाणे येथे अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, सदर गुन्हयाचा तपास कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, मोहिनी भोगे, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, समीर शेख, कामती पोलीस ठाणेचे बापूसाहेब दुधे, चंद्रकांत कदम, सचिन जाधवर, अमोल नायकोडे, परमेश्वर जाधव, भरत चौधरी यांनी बजावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.