Solapur Dance Bar : 'असतील नोटा तर बारबालांना भेटा' डान्स बारच्या आडून चालवला जातोय सेक्सचा बाजार

वासनेची आग शमविण्याबरोबरच शरीरसुखाची चटक लागलेली तरुणाई जणू चेकाळलीय. बक्कळ ‘माया’ ओतल्यास सौंदर्याची खाण असणारी सौंदर्यवती आपली होऊ शकतेय, या खुळ्या विचारानं दलदलीत फसलेली तरुणाई.
Solapur Dance Bar
Solapur Dance Barsakal
Updated on

शिवाजीे भोसले : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - सोलापूर शहर अन् ग्रामीण भागात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चालविल्या जाणाऱ्या डान्स बारच्या आडून ‘सेक्सचा बाजार’ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मादक सौंदर्य अन् अंगविक्षेपाने घायाळ करणाऱ्या डान्स बारमधील सौंदर्यवतींना भुलून तरुणाई त्यांच्यावर अक्षरश: जीव ओवाळून टाकायला तयार होतेय.

वासनेची आग शमविण्याबरोबरच शरीरसुखाची चटक लागलेली तरुणाई जणू चेकाळलीय. बक्कळ ‘माया’ ओतल्यास सौंदर्याची खाण असणारी सौंदर्यवती आपली होऊ शकतेय, या खुळ्या विचारानं दलदलीत फसलेली तरुणाई ‘असतील नोटा तर बारबालांना भेटा’ या बारबाला अन्‌ डान्स बार चालकांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देतेय.

Solapur Dance Bar
Solapur Dance Bar : ‘हररोज छमछम’ दोनशे कोटींची ‘माया’; बकाल सोलापूरचं पुन्हा अध:पतन!

उत्तर प्रदेश, बांगलादेश, कोलकता, मुंबई, नागपूर, पुणे या ठिकाणांहून पैसा कमविण्यासाठी सोलापुरात आलेल्या बारबालांनी इथल्या तरुणाईला चांगलीच भुरळ घातलीय. डान्स बारमध्ये आलेल्या तरुणांवर आपल्या मादक सौंदर्याची मोहिनी पाडायची, डान्सबारमध्ये तरुणांना येण्याची ‘बार बार’ ऑफर द्यायची,

यातून ओळख आणि सलगी वाढवायची अन् ‘माया’ ओतून घेण्याचं आपलं इप्सित साध्य करायचं, असाच ‘सिलसिला’ सध्या सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चाललेल्या डान्स बारमधील बारबाला आणि तरुण यांच्यामध्ये चालू आहे.

Solapur Dance Bar
Solapur: कॉंग्रेस-राष्ट्रवादी युग संपून सोलापूरात भाजपचे नवे युग, विधानसभेनंतर सहकारात मजबूत

‘रात्र धुंदीत ही घालवा’ अशा रंगारंग माहोलात पैशांचा पाऊस पाडल्यानंतर तरुणाईचं पुढचं पाऊल पडतंय ते बारबालांशी सलगी ठेवण्याचं, त्यांच्याशी शय्यासोबत करण्याचं, शरीरसुखाची चटक भागवून घेण्याचं अन्‌ वासनेची आग शमविण्याचं. केवळ ना केवळ कमाईसाठी आलेल्या या बारबाला पहिल्यांदा तरुणांना डान्स बारमध्ये ‘बार बार’ बोलावून घेतात.

तिथे बक्कळ ‘माया’ ओतण्यास भाग पाडतात. त्यानंतर थ्रीस्टार, फाइव्ह स्टार अशा पंचतारांकित महागड्या हॉटेलमध्ये नेण्यास भाग पाडतात. तेथे खाण्या-पिण्याची मनसोक्त हौस भागवायची. हॉटेलिंगचा प्रकार काही दिवस चालल्यानंतर बारबालांचा पुढे मोर्चा वळतो तो शॉपिंगसाठी.

Solapur Dance Bar
Pune News : अभ्यासेतर उपक्रमांतून घडतो विद्यार्थी - डॉ. मोहन आगाशे

फक्त पैशावर प्रेम ठेवत ‘माया’ ओतून घेण्यासाठी जाळ्यात अडकविलेल्या अन् नादाला लावलेल्या तरुणांना बारबाला शॉपिंगला नेण्यास भाग पाडतात. मोठ-मोठ्या मॉल्समध्ये कपडे, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने खास करून सोन्याचे दागिने असं हजारो रुपयांचं शॉपिंग या बारबाला तरुणांच्या जिवावर करून घेताहेत.

शॉपिंग करून घेणंदेखील त्यांच्याकडून अनेक दिवस चालतं. दरम्यान, हॉटेलिंग, शॉपिंग हा ट्रॅक मनसोक्तपणे कित्येक दिवस चालल्यानंतर बारबाला लॉजवरील सेटिंगसाठी तयार होतात.

तिथं तरुणांची वासनेची आग क्षमते. शरीरसुखाच्या लागलेल्या चटकची हौस भागविली जाते. बारबाला ललनांबरोबरच्या इथंपर्यंतच्या प्रवासाच्या वळणावर तरुण भिकेकंगाल बनतोय. त्याचा संसार अक्षरश: देशोधडीला लागतोय.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत ऑर्केस्ट्रा बारच्या आडून बेकायदा कोणी डान्स बार चालवत असेल तर ते चुकीचे आणि गंभीर आहे. बेकायदा डान्स बार आपण चालू देणार नाही. अनधिकृत डान्स बार आणि त्यामध्ये चाललेले आक्षेपार्ह प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.

ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली चाललेल्या डान्स बारबद्दल संपूर्ण माहिती घेऊ, इतकेच काय तर ऑर्केस्ट्रा बारदेखील नियमाने चालविले जातात की नाही, याची पडताळणी केली जाईल. यामध्ये काही आक्षेपार्ह चालत असेल तर त्याला देखील लगाम घातला जाईल. कोणत्याही परिस्थितीत डान्स बार चालू देणार नाही. संबंधितांवर निश्‍चितपणे ठोस कारवाई केली जाईल.

-शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलिस दल.

Solapur Dance Bar
Solapur : पत्त्यांची जादू गिनीजबुकात ! सोलापूरच्या विद्यार्थ्याने केला अनोखा जागतिक विक्रम

सोलापूर पोलिस आयुक्तालय हद्दीत डान्स बार चालविण्याचा कोणालाही अधिकृत परवाना देण्यात आलेला नाही. डान्स बारला परवाना मिळण्यासाठी शिफारस देण्याबद्दल पोलिस आयुक्तालयाकडे प्रस्ताव आले होते, दरम्यान, हे प्रस्ताव फेटाळून लावण्यात आले आहेत. नियम व अटींच्या आधारे ऑर्केस्ट्रा बार चालविण्याचे काही परवाने देण्यात आले आहेत.

मात्र, आर्केस्ट्राच्या आडून डान्स बार चालविण्याचा प्रकार होत असेल तर संबंधित प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल. सोलापूर शहर हद्दीत एका बेकायदा डान्स बारवर कारवाई करण्यात आली आहे.

कोणत्याही परिस्थितीत डान्स बार चालू देणार नाही म्हणजे नाही. शहर पोलिस दलामधील संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास आदेश देऊ. नियम पायदळी तुडवून चालविल्या जाणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारचे परवानेदेखील निलंबित करण्याची प्रसंगी कारवाई केली जाईल.

- राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.