चालू वर्षी चांगला झालेल्या पावसाने दिवाळीच्या बाजारात नवा उत्साह भरला. वाहने, सोने-चांदी, जमीन अन् घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे अशा विविध खरेदीची तब्बल १०० कोटींपर्यंत उलाढाल झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणेे आहे..मागील महिनाभरापासून दिवाळीची जय्यत तयारी बाजारात सुरु होती. नव्या वाहनांची बुकिंग फार आधीपासून सुरु होती. कपडे बाजारदेखील दिवाळी अन् लग्नसराईसाठी आधीपासून तयार होता.यावर्षी फक्त सोने व चांदी महागल्याने खरेदीवर काही अडचण होती. पण गुंतवणुकदारांनी महागलेल्या दराची संधीत रूपांतर केले. वाहन बाजाराने विक्रीचा उच्चांक गाठला. यावेळी वाहन कर्जाची मुदत तीन ऐवजी पाच वर्षे झाल्याने इएमआयची रक्कम कमी होऊन ग्राहकांनी त्याचा लाभ घेतला. सर्वच वाहन उद्योगांनी डिस्काऊंट ऑफरचा पाऊस पाडला. मोबाईल विक्रीत देखील नवे मॉडेल्स, लोन सुविधांनी मोठाच प्रतिसाद मिळाला..Solapur : चित्रकला, गायनातील करिअरसह विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.दुचाकी अन् चारचाकीची विक्री जोरातयावर्षी बाजारात दुचाकी व चारचाकी गाड्यांची खरेदी चढाओढीने झाली. नियमित वापराच्या स्कूटर प्रकारातील गाड्यांसह स्पोर्ट्स बाईक, लक्झरी बाईक, ई व्हेईकल असे सर्वच दुचाकीचे प्रकार विक्री झाले. चारचाकी गाड्यांची आधीच बुकिंग करून मुहूर्तावर खरेदी करण्यात आली. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरात नव्या वाहनाची पूजा करण्यासाठीदेखील गर्दी झाल्याचे चित्र होते. पॅनेलचे एलईडी, एक्स्चेंजवर जोरइलेक्ट्रॉनिक्स प्रकारात खरेदीचा जोर मोठाच होता. यावर्षी नियमित होम अप्लायन्सेसची मागणी मोठी होती. मोट्या पॅनेलच्या एलईडीची मागणी वाढली. तसेच एक्स्चेंज ऑफरचा देखील लाभ मोठ्या प्रमाणात लोकांनी घेतला. ग्राहकांनी जादा क्षमतेचे अप्लायन्सेसची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली होती..महागाई तरीही खरेदी चांगलीयादिवाळीत महाग झालेले सोने व चांदी हा घटक महत्त्वाचा ठरला. अत्यंत उत्साहात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खरेदीत हात आखडता घ्यावा लागला. पण तरीही खरेदीचा मुहूर्त ग्राहकांनी साधला. तर ग्राहकाच्या तुलनेत गुंतवणूकदारांनी मात्र जोर लावल्याने खरेदीचा आकडा वाढता राहिला. ब्रॅड व पारंपरिक व्यवसायिकांकडून झालेल्या सोने खरेदीचा आकडा २५ कोटींच्यावर गेला. यावर्षी बाजारपेठेत उत्साह चांगला होता. दिवाळी अपेक्षेनुसार उत्तम झाली. जास्त क्षमतेची अप्लायन्सेसची मागणी चांगलीच होती. यावर्षी पाऊस अन् शेतीची स्थिती चांगली असल्याने त्याचा लाभ बाजाराला झाला.- आनंद येमूल, अध्यक्ष, सेडा सोलापूर.यावर्षी भाव सोने व चांदीचे भाव वाढल्याचा परिणाम दिसून आला. एका ग्राहकांकडून जास्त सोने खरेदी करण्याच्या तुलनेत एकूण ग्राहकाच्या खरेदीने परिणाम चांगला झाला. चांदीची खरेदी देखील भाववाढीने ताणली गेली. मात्र पुढील काळात सोने व चांदीचे भाव अधिक वाढू शकतात हे लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या उद्देशाने खरेदी झाली.- योगेश निंबाळे, सोनेचांदी व्यापारी सोलापूर डिस्काऊंट ऑफर्सची लोकांना पेट्रोल, डिझेल, सीएनजी व इलेक्ट्रीक अशा चार प्रकारात वाहने उपलब्ध होती. बॅंका व वित्तीय संस्थांनी जोरदार सहकार्य केल्याने खरेदीला वेग आला. यावर्षीचा दिवाळी बाजाराच निश्चितच आशादायी अन् आनंददायी ठरला.- बाबू चव्हाण, विश्वस्त, सोलापूर ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन ग्राहकांनी वाहन खरेदीत प्रिमियम अन् सेफ्टी या दोन गोष्टीला प्राधान्य दिले. आर्थिक मदतीच्या योजनादेखील ग्राहकांना अधिक लाभदायी ठरल्या. बाजारातील सर्वच वाहनांचा स्टॉक संपला.- नितीन बिज्जरगी, सदस्य, सोलापूर ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.