Solapur : पोटचा गोळा गेल्याचं डोंगराएवढं दु:ख आवरून मुलाचे नेत्रदान

सुरेश शेंडगे यांचा जनजागृतीचा वसा; ‘आधी केले मग सांगितले’ उक्तीचा प्रत्यय, विठ्ठलवाडीत १७ जणांचे दृष्टिदान
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर - स्वत:च्या १४ वर्षीय मुलाचा २००४ मध्ये विहिरीत बुडून मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी सुरू डोंगराएवढे दु:ख आवरून स्वत:ला सावरत एक बाप डॉक्टरकडे जातो आणि मला माझ्या मुलाचे नेत्रदान करायचे आहे, असे सांगतो अन्‌ याच जनजागृतीचा वसा विठ्ठलवाडी (ता. माढा) सारख्या छोट्याशा गावात आजही सुरू ठेवतो, आजपावेतो १७ नेत्रदान त्यांच्या प्रेरणेने होते,‘आधी केले अन्‌ मग सांगितले’ उक्तीचा प्रत्यय येतो, ही गोष्ट आहे सुरेश शेंडगे यांची.

सुरेश रघुनाथ शेंडगे यांचा १४ वर्षाचा मुलगा विक्रम शेंडगे हा त्याच्या समवयस्क मित्राबरोबर (अमोल इंगळे) विहिरीत पडून मृत्यू पावला. पोस्टमार्टेम माढा येथे सुरू असताना. आपला मुलगा तर गेला. त्याच्या नेत्रदानातून इतर कोणालातरी दृष्टी मिळत असेल तर नेत्रदान करायला काय हरकत आहे, असे म्हणून स्वत:च मुलाचे नेत्रदान करण्याचा विचार डॉक्टरांना बोलून दाखवला अन् यातून एक चळवळच उभा राहिली.

सुरेश रघुनाथ शेंडगे यांचा १४ वर्षाचा मुलगा विक्रम शेंडगे हा त्याच्या समवयस्क मित्राबरोबर (अमोल इंगळे) विहिरीत पडून मृत्यू पावला. पोस्टमार्टेम माढा येथे सुरू असताना. आपला मुलगा तर गेला. त्याच्या नेत्रदानातून इतर कोणालातरी दृष्टी मिळत असेल तर नेत्रदान करायला काय हरकत आहे, असे म्हणून स्वत:च मुलाचे नेत्रदान करण्याचा विचार डॉक्टरांना बोलून दाखवला अन् यातून एक चळवळच उभा राहिली.

solapur
Solapur News : बंदी असताना अवजड वाहन नेले,गांधीगिरी करत चालकाचा सत्कार केला

सुरेश शेंडगे हे वाळूज प्रशाला, वाळूज (ता.मोहोळ) येथून माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. नेत्रदानाच्या संकल्पाबद्दल ते सांगतात, की २१ फेब्रुवारी २००४ रोजी माझा १४ वर्षाचा मुलगा विक्रम शेंडगे व त्याचा मित्र अमोल इंगळे हे विठ्ठलवाडीजवळच्या विहिरीत चुकून पडले आणि पोहता येत नसल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. मुलाचे शवविच्छेदन सुरू असतानाच मी मुलाच्या मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय घेतला. डॉक्टरांकडे गेलो व नेत्रदानाचा निर्णय कळविला.

solapur
Solapur : आरक्षणासाठी आत्महत्या करू नका; पोरचं मेली तर आरक्षण घेवून करायचं काय - मनोज जरांगे पाटील

त्यांनी पुन्हा विचार करा, असं सांगितले. ग्रामीण भागातील लोक अनेक प्रश्न विचारत असतात. तुम्ही काय उत्तर देणार, असा प्रश्न करताच, त्यांना उत्तर देण्यास मी खंबीर आहे. तुम्ही प्रक्रिया पूर्ण करा, असे सांगितले. याचवेळी डॉक्टरांनी अमोल इंगळे याचे वडील विलास इंगळे यांनाही नेत्रदानाबद्दल विचारले असता त्यांनीही तयारी दर्शवली. सर जो निर्णय घेतील तोच माझाही असे सांगितले. त्याचदिवशी विठ्ठलवाडीत पहिल्यांदाच एकाच दिवशी दोन नेत्रदान झाले.

या घटनेपासून गावकऱ्यांना मरणोत्तर नेत्रदान करता येत व नेत्रदानमुळे दृष्टीहिनास दृष्टी मिळते, ही गोष्ट कळली. त्यांनतर आमच्या गावात आम्ही ही चळवळच सुरू केली. मी व माझे मित्र दीपक गव्हाणे, हनुमंत जाधव तसेच गावचे सरंपच, पोलिस पाटील यांनी अनेकांना नेत्रदानास प्रवृत्त केले. अनेकांनी स्वत:हून तयारी दर्शवली. आजपर्यंत आम्ही अवघ्या पंधराशे लोकवस्तीच्या गावात १७ मरणोत्तर नेत्रदान केले आहेत.

solapur
Solapur : आयुष्यभर देशासाठी झिजलेला देह, वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांसाठी दान

सुरवातीला मला माढा येथील कै. रमण दोशी यांच्यापासून नेत्रदान चळवळीची प्रेरणा मिळाली. त्यानंतर माढा येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. अशोक मेहता व कापड व्यापारी विशाल शहा यांच्या सहकार्यामुळे आम्ही हे कार्य अधिक जोमाने करू शकलो. गावात जेव्हा कुणाचेही निधन होते. तेव्हा आम्ही त्या घरातील प्रमुख व्यक्तीची भेट घेऊन नेत्रदानाबद्दल माहिती देतो. त्यांची तयारी असेल तर लगेच नेत्रपेढीला कळवून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाते. गावकरी व मित्र सहकार्य करतात.

सुरेश शेंडगे, विठ्ठलवाडी, ता. माढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.