Solapur - हिवरगाव, खोमनाळ,भाळवणी,चिखलगी,मारोळी,शिरनांदगी,रड्डे, सिद्धनकेरी गावचा गाव भेट दौरा केला. त्यावेळी त्यांनी भाळवणी येथे हा इशारा दिला यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण सचिन शिवशरण नागेश डोंगरे,
तहसीलदार मदन जाधव गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील ग्रामीण पाणीपुरवठा चे राजकुमार पांडव महावितरणचे आसबे,तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे जिल्हा परिषद बांधकामचे नंदकुमार कोष्टी आरोग्य अधिकारी जानकर विष्णू चौगुले ,पांडुरंग चौगुले, सत्यवान कोडग,धनाजी काटकर, प्रविण चव्हाण, अशोक माने रावसाहेब फटे, ज्ञानेश्वर बळवंतराव आधीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाळवणी येथे बाळासाहेब ढगे यांनी रक्त वाढीच्या गोळ्या आरोग्य उपकेंद्रातून रक्त वाढीच्या गोळ्या दिल्या जात नसल्याची तक्रार केली तर काशिनाथ सावंजी यांनी ॲडिशनल डीपीच्या संदर्भात यापूर्वी देखील मागणी केली. त्याची पूर्तता झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले तर श्रीकांत निकम यांनी अन्नसुरक्षा देण्यात नवीन शिधापत्रिकाचा समावेश करण्याची मागणी तहसील कार्यालयात प्रलंबित असल्याचे सांगितले.
रड्डे येथील उपकेंद्रात डॉक्टर येत नसल्याचे तक्रार नागरिकांनी केल्याने त्यालाही कारणे दाखवा नोटीस काढण्याच्या सूचना देत तालुका वैद्यकीय अधिकारी जानकर यांना आरोग्याच्या बाबतीत मी कोणत्याही अधिकाऱ्याची गय करणार नाही.
अशा सूचना दिल्या त्याचबरोबर निंबोनी येथे मंजूर झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा आढावा घेतला असता त्या जागेवर अनेक लोकांनी अतिक्रमण केले असल्याचे येथील भारत ढगे यांनी सांगितल्यानंतर तहसीलदारांना त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याच्या सूचनाही आमदाराकडे यांनी दिल्या.
अनेक गरीब लाभार्थी हे अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नाहीत त्यामुळे त्यांना रेशनचे धान्य मिळत नाही सध्या तालुक्याला पाच हजार लाभार्थ्यांना समाविष्ट करण्याचा इष्टांक प्राप्त झाला असून प्रत्येक ग्रामपंचायतीने योजनेच्या निकष व अटीमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत त्यांचा या योजनेमध्ये समावेश करून त्यांना धान्य वितरित केले जाईल अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
वनविभाग व महावितरण चा प्रश्न अधिवेशनात मांडणार
वनविभागाने ग्रामपंचायत ची परवानगी न घेता अनेक जागा स्वतःच्या ताब्यात घेतल्याच्या तक्रारी काही गावांमध्ये येत असून त्या संदर्भातील प्रश्न त्याचबरोबर महावितरण ने 2010-11 साली महावितरण आपल्या दारी अंतर्गत भरून घेतलेल्या वीज कनेक्शन चे कनेक्शन जोडून दिले नाहीत.
मात्र त्या शेतकऱ्यांना लाखोंची बिले आली आहेत सध्या ही योजना बंद झाल्याचे सांगून त्या लोकांना नवीन कनेक्शन भरायला सांगितले जात आहे यासंदर्भात ही येथे अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आमदार अवताडे यांनी दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.