Watch Video: आमची गावे विकायला आला काय? शिंदेंचा कार्यकर्ता दादांच्या आमदारावर भडकला; पालकमंत्र्यांसमोरच जोरदार राडा

Mohol MLA: अनगरच्या नवीन अपर तहसील कार्यालयावरून मोहोळचे राजकारण सध्या तापले आहे. त्याचे पडसाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटले आणि यावरून जोरदार खडाजंगी झाली.
Solapur DPDC Meeting
Solapur DPDC MeetingEsakal
Updated on

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीची काल बैठक पार पडली. पण बैठक गाजली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यककर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आमदारातील वादाने.

अनगरच्या नवीन अपर तहसील कार्यालयावरून मोहोळचे राजकारण सध्या तापले आहे. त्याचे पडसाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटले आणि यावरून जोरदार खडाजंगी झाली.

मोहोळचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, डीपीसी सदस्य चरण चवरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यात यावेळी जोरदार बाचाबाची झाली.

ही बैठक सुरू असताना अनगरच्या प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाचा विषय काढत त्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी चरण चवरे यांनी केली. तेव्हा मोहोळचे आमदार माने यांनी आक्षेप घेतला.

यावेळी चवरे यांनी आमदार माने यांचा एकेरी उल्लेख करत निषेध व्यक्त केला. त्यामुळे आमदार माने देखील संतापल्याचे पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांकडे बोट करत बोलत असल्याचे पाहून व्यथित झालेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

Solapur DPDC Meeting
What is Cusack TMC: हे क्युसेक, टीएमसी, विसर्ग म्हणजे काय रे भाऊ? सतत पडतात कानावर शब्द, सोप्या शब्दात समजून घ्या...

नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री सभागृहात बोलो किंवा बाहेर बोलो, त्यांचे वाक्य म्हणजे कायदा असतो." यावर सदस्य चरण चवरे म्हणाले, "अनगर अपर तहसील कार्यालयाचा निर्णय रद्द करावा. या मागणीच्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला स्थगिती देत फेर सर्वेचा शेरा लिहिला आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तरीही या निर्णयाला अद्याप स्थगिती का मिळाली नाही?"

पुढे बोलताना चवरे म्हणाले "जाणूनबुजून आम्हाला अनगरच्या दारात नेण्याचं काम केलं आहे. जर हे अपर तहसील कार्यालय रद्द झाले नाही, तर शंभर लोकांचे मृत्यू होतील. मी यशवंत मानेचा निषेध करतो. तू काय सांगतो? आमची गावे विकायला आला काय? तू खाली बस..." अशा एकेरी शब्दांत चरण चवरे यांनी आमदार माने यांच्यावर हल्लाबोल केला.

Solapur DPDC Meeting
Jarange Patil Rally : जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये समारोप; अखंड मराठा समाज बैठकीत रॅलीचे नियोजन

हा सर्व वाद सुरू असताना आमदार माने यांनी 'ये चरण, तुझा काय संबंध' असं म्हणताच मनिष काळजे आणि चरण चवरे यांनी आमदार माने यांच्या विरोधात केली.

यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. एकमेकांकडे बोट करून अरे-तुरेची भाषा वापरण्यात आली.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं. परंतु, त्यांचे कुणीही ऐकलं नाही. काही वेळ सभागृहातील सदस्य या गोंधळाकडे बघतच राहिले.

आमदार विजयकुमार देशमुख यांनी चवरे आणि काळजे यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. काही मिनिटांनी वादावर पडदा पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.