Solapur: शाही जामा मस्जिद मध्ये जुमाच्या नमाज बरोबर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर!

हिंदुस्थानच्या संविधानाला जन्म देणाऱ्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्म दिवस खरया अर्थाने ज्ञान दिवस म्हणून साजरा करावा असे गौरवोद्गार शाही जामा मस्जिदचे पेशईमाम मौलाना मोहमद मेराज यांनी आपल्या प्रवचनात काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरsakal
Updated on

ब्रह्मपुरी - मंगळवेढा शहरातील ऐतिहासिक व प्राचीन असलेल्या शाही जामा मस्जिद मध्ये आज पवित्र रमजान महिन्याच्या जुम्माची नमाज बरोबर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर पहायला मिळाला .

हिंदुस्थानच्या संविधानाला जन्म देणाऱ्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्म दिवस खरया अर्थाने ज्ञान दिवस म्हणून साजरा करावा असे गौरवोद्गार शाही जामा मस्जिदचे पेशईमाम मौलाना मोहमद मेराज यांनी आपल्या प्रवचनात काढले.

पवित्र रमजान महिन्यातील शुक्रवारची सामुदायिक जुमाची नमाज मंगळवेढा शहरातील प्राचीन शाही जामा मस्जिद येथे पठन करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Pune News : आरोग्य तपासणी शिबिराने महापुरुषांची जयंती साजरी करणे म्हणजे आधुनिक भारताची नांदी; सावंत

जुमाच्या नमाज पठन प्रारंभी शाही जामा मस्जिदचे पेशईमाम मौलाना मोहमद मेराज यांनी आपल्या खुदबा मध्ये अल्लाह, पवित्र रमजान महिना आणि इस्लामचे प्रेषित हजरत मोहमद पैगंबर यांनी दिलेल्या उपदेशाचे पालन करणे आवश्यक आहे.

असे अध्यात्मिक विचार मांडत आपल्या जीवनात ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे.ज्ञान निर्मितीने क्रांती घडते.हिंदुस्थानच्या संविधान निर्मिती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाच्या जोरावर केली आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आजचा जन्म दिवस ज्ञान दिवस म्हणून साजरा करायचा पाहीजे असे सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Mumbai Pune एक्सप्रेस वे वर पोलिस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, ड्युटीवर जाताना बसने दिली धडक

इस्लामच्या जुमा नमाज व खुदबा प्रवचनात पहिल्यांदाच अध्यात्मिक विषया बरोबर देशाच्या संविधान व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल विचार मांडल्याने नमाज करिता आलेल्या मुस्लिम बांधवात उत्साह व एकाग्रता दिसून आली.त्यामुळे शाही जामा मस्जिद मध्ये अनोख्या वैचारिक पद्धतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

मुस्लिम जमियतचे चेअरमन व शाही जामा मस्जिदचे प्रमुख फिरोज मुलाणी यांनी इस्लामिक अध्यात्मिक विचार बरोबर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सारख्या महामानवाचे विचार समाजापुढे मांडले तर देशाची एकात्मता टिकवण्यास मदत होईल.

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाने दिला असून त्याची प्रत्येक भारतीय नागरिकाला जाणीव असली पाहिजे असे सांगितले.मंगळवेढा शहरातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.