भाजप निवडणुका हारले की काहीच बोलायचं नाही, भाजप निवडणुका जिंकल्या की ईव्हीएमला दोष द्यायचा ही दुटप्पी भूमिका योग्य नाही.
सोलापूर - भाजप निवडणुका हारले की काहीच बोलायचं नाही, भाजप निवडणुका जिंकल्या की ईव्हीएमला दोष द्यायचा ही दुटप्पी भूमिका योग्य नाही. निवडणुका जिंकू किंवा हारू हे महत्त्वाचे नाही. अनेक देशांनी ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास सुरवात केली आहे. भारताने ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरद्वारेच निवडणुका घ्याव्यात असे मत माजी खासदार अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.
सोलापुरातील एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर त्यांनी सातरस्ता येथील शासकीय निवासस्थानात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सुधीर चंदनशिवे, चंद्रकांत कोळेकर आदी उपस्थित होते. डॉ. मुणगेकर म्हणाले, हिंदू धर्म आणि हिंदुत्व वेगळे आहे. भाजप हिंदू-मुस्लिम या मुद्याचा निवडणुकीसाठी वापर करत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या हिंदुत्वाची जी व्याख्या सांगत आहेत तीच व्याख्या योग्य असल्याचेही डॉ. मुणगेकर यांनी सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मी स्वातंत्र्यवीर मानत नाही. कारावासात राहिलेल्या इतर व्यक्तींना तुम्ही स्वातंत्र्यसैनिक म्हणता आणि सावरकरांना स्वातंत्र्यवीर म्हणणे बरोबर नाही. त्यांनी स्वातंत्र्यासाठी हाल, अपेष्टा सहन केल्या आहेत. त्यांच्या पेक्षाही जास्त हाल अपेष्टा, जीव अनेकांनी गमावलेला आहे. सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितली ही देखील वस्तुस्थिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी तीच वस्तुस्थिती सांगत असल्याचे डॉ. मुणगेकर यांनी स्पष्ट केले.
भाजपला संविधानातील धर्मनिरपेक्ष आणि समतावादी हे दोन्ही शब्द पटत नाहीत. संविधान मोडण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौतम आदानी यांच्या संदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान देऊ शकत नसल्याने गांधी यांच्यावर ही कारवाई केली आहे. पंतप्रधान मोदी हे आतून घाबरले आहे. भारत जोडो यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांना भीती वाटू लागल्याचेही डॉ. मुणगेकर यांनी सांगितले.
अदानी प्रकरणात जेपीसी हवीच
अदानी यांच्या संदर्भात हिंडनबर्ग कंपनीने केलेला अहवाल अभ्यासपूर्ण आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जॉइंट पार्लमेंटरी कमिटी आवश्यकच आहे. या कमिटीमध्ये सत्ताधारी भाजपचे अधिक सदस्य असणार हे जरी खरे असले तरीही भाजपचा जेपीसीला का विरोध आहे? असा प्रश्न डॉ. मुणगेकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेपीसी संदर्भात घेतलेल्या भूमिकेबद्दल डॉ. मुणगेकर म्हणाले ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. या प्रकरणात चौकशीसाठी जेपीसी आवश्यकच असल्याचे हे माझे मत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.