Solapur : नेत्रदान चळवळीचं विस्तारलंय क्षितीज; राज्यात सोलापूर टॉपर्सच्या यादीत

आय बँकेत जाऊन नेत्रदानासाठी आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी
 Eye donation
Eye donation sakal
Updated on

शिवाजी भोसले

सोलापूर : ‘डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे... डोळे हे जुलमी गडे’ डोळ्यांचे वर्णन करणारी अशी कित्येक गीतं आपण ऐकलेली आहेत. खरंच डोळे नसतील तर जगणं खूप कठीण आहे. पाणीदार, सुंदर डोळे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसाच! डोळे म्हणजे मानवाला मिळालेली नैसर्गिक देणगी अर्थात वरदान. निसर्गाकडून मिळालेलं हेच वरदान किंवा देणगी मानव दुसऱ्या मानवाला देऊ शकतो... ‘दातृत्वा’ची ही किती सुखावणारी आणि सकारात्मक गोष्ट. संपूर्ण हयातीत आपल्या डोळ्यांनी हे सुंदर जग बघायचं, अनुभवायचं अन् कायमचे डोळे मिटले की, पुन्हा दोघांना हेच सुंदर जग पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी डोळे द्यायचे, नेत्रदान करायचं... अर्थातच ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ संकल्पनेतून..!

हो, आपल्या सोलापुरात असंच खूप सकारात्मक अन् सुखावणारं घडतंय.. मेडिकल हब असलेल्या आपल्या हुतात्मानगरीत एखाद्या विस्तारलेल्या वटवृक्षाप्रमाणं इथं नेत्रदानाची चळवळ विस्तारली आहे. विज्ञान अन् तंत्रज्ञानाच्या वाटा चोखाळत ‘आयुष्याचा ट्रॅक’ तयार केलेल्या नव्या पिढीनं नेत्रदान संबंधीचे गैरसमज, अंधश्रद्धा, परंपरा याला मूठमाती देऊन आपल्यानंतरही आपले डोळे हे सुंदर जग पाहण्यासाठी कोणाच्यातरी उपयोगी पडावेत, असा सकारात्मक विचार करून नेत्रदानाचा संकल्प केलाय. नेत्रदान करून नव्या पिढीला ‘मृत्युंजय’ व्हायचंय. त्यांच्या ‘दातृत्वा’च्या या उदात्त विचाराला अन् भावनेला खरोखरंच मुजरा!

नेत्रदान कसे करावे?

सगळ्यात आधी जवळच्या दवाखान्यात, आय बँकेत जाऊन नेत्रदानासाठी आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी. जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा त्या आय बँकमध्ये कळवले जाते. पाच-सहा तासांत ही नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली जाते. आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे काढून एखाद्या गरजू अंध व्यक्तीला दिले जातात.

दृष्टिदान/नेत्रदानाचे महत्त्व

एखादी व्यक्ती जन्मतः अंध असल्यास किंवा अपघाती त्याची दृष्टी गेलेली असल्यास त्याला नेत्रदानाने दृष्टी प्राप्त होऊ शकते

नेत्रदान हे व्यक्तीच्या संमतीने करवून घेतले जाते आणि ते मृत्यूनंतरच केले जात असल्याने, आयुष्य जगताना व्यक्तीच्या आयुष्यात दृष्टीबाबत कोणतीही अडचण येत नाही.

आपला मृत्यू झाल्यानंतर डोळ्यांचा स्वतःला आणि कुटुंबीयांना देखील काहीही उपयोग होत नसतो. जर आपण ते दान केले तर कोणत्याही दृष्टिहीन व्यक्तीला त्याचा लाभ होऊ शकतो.

जगभरातील दृष्टिहीनतेची समस्या ओळखून त्यावर उपाय म्हणून नेत्रदान ही संकल्पना लोकांसमोर मांडण्यात आली. त्यानिमित्ताने जनजागृती होण्यासाठी जागतिक स्तरावर दृष्टिदान दिन साजरा करण्यात येतो.

नेत्रदान करताना घ्यावयाची काळजी

व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत नेत्रदान करवून घ्यावे

मृत्यू झाल्यानंतर डोळ्यांवर कापसाचा बोळा ठेवावा

अपघाती किंवा अन्य कारणांनी मृत्यू झाल्यास डोळ्यांमध्ये सूक्ष्म जंतुनाशकाचे थेंब टाकावेत

नेत्रदानाची प्रक्रिया करताना डोळ्यांना कोणताही संसर्ग नाही ना, हे तपासून पाहावे अथवा संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी

डोळ्यांचे आजार असल्यास नेत्रदान करू नये

नेत्रदान कोण करू शकतात?

एक वर्षावरील प्रत्येक व्यक्ती नेत्रदान करू शकते

नेत्रदानासाठी वयाची मर्यादा नाही

नेत्रदान करण्याची प्रक्रिया अवघड नाही

व्यक्तीच्या मृत्यूनंतर ५-६ तासांत होते नेत्रदानाची प्रक्रिया

मृत्यूपूर्वी नोंदणी केली नसली तरी करता येते नेत्रदान

मृत्यूनंतर नातेवाइकांनी नेत्रपेढीशी संपर्क करावा

नेत्रदानाबद्दल सर्वात मोठा गैरसमज

नेत्रदानासंदर्भात आपल्याकडे सर्वात मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे नेत्रदान करताना डोळे काढले जातात. पण तसे अजिबात केले जात नाही. डोळ्याचा जो सर्वात पुढचा स्तर आहे, तो काढला जातो. डोळे काढले जात नाहीत, चेहरा विद्रूप होत नाही.

तोष्णीवाल नेत्रपेढी राज्यात दुसऱ्या क्रमांकाची

सोलापुरातील नेत्रदान चळवळीबद्दल मिश्रीबाई तोष्णीवाल नेत्रपेढीचे संचालक डॉ. नवनीत तोष्णीवाल सांगतात, की १९८८ साली महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची खासगी नेत्रपेढी डॉ. श्‍याम तोष्णीवाल यांनी सुरू केली. तत्कालीन वेळी वर्षभरात सहा डोळे दानातून मिळायचे. आता खूप विस्तार झाला आहे. नेत्रदानातून वर्षात सुमारे ८० ते ८५ डोळे मिळतात. मिश्रीबार्ई तोष्णीवाल नेत्रपेढीला आजवर अंदाजे २३०० ते २४०० डोळे मिळाले. यातून १५०० दृष्टिहीन लोकांना दृष्टी देता आली. सोलापुरात नेत्रदान करणारे काही परिवार आहेत. त्यामुळे चळवळ चांगलीच फोफावली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सोलापूर हे नेत्रदानात राज्यात टॉपवर आहे.

तोष्णीवाल नेत्रपेढी राज्यात दुसऱ्या क्रमांकाची

सोलापुरातील नेत्रदान चळवळीबद्दल मिश्रीबाई तोष्णीवाल नेत्रपेढीचे संचालक डॉ. नवनीत तोष्णीवाल सांगतात, की १९८८ साली महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची खासगी नेत्रपेढी डॉ. श्‍याम तोष्णीवाल यांनी सुरू केली. तत्कालीन वेळी वर्षभरात सहा डोळे दानातून मिळायचे. आता खूप विस्तार झाला आहे. नेत्रदानातून वर्षात सुमारे ८० ते ८५ डोळे मिळतात. मिश्रीबार्ई तोष्णीवाल नेत्रपेढीला आजवर अंदाजे २३०० ते २४०० डोळे मिळाले. यातून १५०० दृष्टिहीन लोकांना दृष्टी देता आली. सोलापुरात नेत्रदान करणारे काही परिवार आहेत. त्यामुळे चळवळ चांगलीच फोफावली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सोलापूर हे नेत्रदानात राज्यात टॉपवर आहे.

लोकांची सकारात्मक मानसिकता

सोलापूरच्या नेत्रदान चळवळीबद्दल जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. गणेश इंदूरकर म्हणाले, इथली चळवळ चांगली विस्तारली आहे. नेत्रदान करण्याबद्दल लोकांची मानसिकता खूप बदलली आहे. त्यातून या इथली चळवळ राज्यात आघाडीवर राहिली आहे. दृष्टिहीन लोकांना दृष्टी मिळण्यास मदत होत आहे. तरुणाई नेत्रदानाच्या संकल्पात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक दिसत आहे. सिव्हिल हॉस्पिटल आणि डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्रदान चळवळीमधील काम प्रभावी आहे.

नेत्रदान चळवळीने घेतली उभारी

सिव्हिल हॉस्पिटलचे नेत्र समुदेशक विकास लिंगराज सांगतात की, सोलापूरच्या नेत्रदान चळवळीने चांगली उभारी घेतली आहे. मागच्या पाच वर्षात तब्बल १० हजार ४९६ जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. १८ ते ३० या वयोगटातील तरुणाई संकल्प करण्यात सर्वात पुढे आहे. नेत्रदान पंधरवड्यात जिल्ह्यात नेत्रदान संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळतो. यंदा दोन हजार ६९१ जणांनी नेत्रदानाची तयारी दर्शवली आहे. नेत्रदानासाठी ८४२१२२४२४३ या माझ्या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()