Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात पावसाळ्यातही ८४ टँकर सुरूच; ६५ गावे व ५५२ वाड्या तहानलेल्याच

Water supply shortage in Solapur : काही मंडलात सरासरीच्या जवळपास तर काही मंडलात सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे.
Solapur Water Crisis
Solapur Water CrisisSakal
Updated on

सोलापूर : पावसाळ्याला सुरवात होऊन महिना होत आला तरी अद्याप जिल्ह्यातील ६५ गावे व ५५२ वाड्या - वस्त्यांना ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात एकूण २२८.२ मिलिमीटर पाऊस झाला असला तरी काही मंडलात सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस म्हणजेच असमान पावसामुळे या गावांचा पाणीप्रश्न दूर होऊ शकला नाही. परिणामी टँकर सुरू ठेवावे लागले आहेत.

जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत सरासरीच्या २२२.६ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्याची जूनअखेरची पावसाची सरासरी एकूण १०२.५ मिलिमीटर आहे. तर जिल्ह्यात जूनअखेर एकूण २२८.५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

परंतु पावसाला सुरवात होऊन महिन्याचा कालावधी लोटत आला असला तरी जिल्‍ह्यातील ६५ गावे व ५५२ वाड्या - वस्त्या अद्याप तहानलेल्याच आहेत. करमाळ्यातील अर्जुन नगर मंडलात सर्वाधिक ४११.६ म्हणजे सरासरीच्या (सरासरी ९९.२ मिलिमीटर) ४१४.९ टक्के पाऊस पडला आहे. तर माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर मंडलात सरासरीहूनही (सरासरी ११३ मिलिमीटर) कमी म्हणजे ८१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

Solapur Water Crisis
Solapur News : समानीकरणात अडकली शिक्षकांची ४५० पदे; पटसंख्येच्या तुलनेत पुरेशा शिक्षकांची मागणी

काही मंडलात सरासरीच्या जवळपास तर काही मंडलात सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. यात सुमारे १५ मंडलात ३०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. यावरुन जिल्ह्यात असमान पाऊस पडल्याचे दिसून येते. त्यामुळे पावसानंतरही पिण्‍याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. कारण अजूनही अनेक तलावांमध्ये पाणी नसल्याचे चित्र आहे. पिण्याचे पाणीप्रश्न निकाली निघण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे.

दरम्यान, जिल्ह्यात पाऊस पडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेऊन टँकर कमी करण्याच्या सूचना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिल्या होत्या.

Solapur Water Crisis
Solapur News : जि. प. शिक्षण विभाग अलर्ट;गणवेश बंधनकारक, मोबाईल वापरावर निर्बंध

त्यानुसार जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ४८ टँकर बंद केले होते. १३७ गावांना १६६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मागील आठवड्यात टँकरची संख्या पुन्हा २१४ वर गेली होती. त्यात घट होऊन ती आता ८४ झाली आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी व पंढरपूर हे चार तालुके वगळता उर्वरित सात तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

तालुकानिहाय टँकर संख्या

तालुका - टँकर

  • सांगोला - २०

  • मंगळवेढा -२२

  • माढा - ०३

  • करमाळा - १२

  • माळशिरस - ०७

  • दक्षिण सोलापूर - १६

  • अक्कलकोट - ०४

जिल्ह्यातील काही मंडलात पुरेसा पाऊस पडला नाही. सर्वत्र समान पाऊस न पडल्याने अनेक मंडलातील जलस्रोतांत पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. दक्षिणमधील शिरवळच्या धुबधुबी प्रकल्पासह अनेक प्रकल्पात जलसाठा होऊ शकला नसल्याने ६५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे आणखी पावसाची गरज आहे.

- सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.