सोलापूर : कोरोनामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. सोलापूर-गदग दरम्यान धावणारी सोलापूर-गदग पॅसेंजर सुरू झाली. कोरोनानंतरही ही गाडी पॅसेंजर म्हणून धावत आहे. मात्र, आता येत्या ता. १५ जुलैपासून ती एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे.
सोलापूर-गदग पॅसेंजर एक्स्प्रेस म्हणून धावणार असल्याने सोलापूर-गदग दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. नोकरी, शिक्षण, हॉस्पिटलसाठी सोलापूरला येणाऱ्या रुग्ण प्रवाशांना ही गाडी सोयीस्कर ठरणार आहे. प्रवाशांचा प्रवास आरामदायी, आनंदी होणार आहे. ही गाडी आता एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. सोलापूर-गदग एक्स्प्रेसला एकूण बारा डबे असणार आहेत. यात दहा जनरल तर दोन स्लीपर अशी डब्यांची रचना असणार आहे. या गाडीचे एकूण ३०० किलोमीटर अंतर आहे.
अशी धावणार सोलापूर-गदग एक्स्प्रेस
सोलापूर ११.५०, टिकेकरवाडी १२, होटगी १२.१२, आहेरवाडी १२.२२, सुलेरजवळगे १२.२८, तडवळ १२.३५, पंडूर १२.४२, लच्याण १२.४७, इंडी रोड १२.५६, कलबुर्गी २.०७, अलमट्टी २.३४, बागलकोट ३.१३, गदग ४.५५.
सोलापूर-गदग ही गाडी पॅसेंजर म्हणून धावत होती. मात्र आता ती एक्स्प्रेस म्हणून येत्या १५ जुलैपासून सुरू करण्यात येत आहे. गाडीस एकूण १२ कोच असणार असून, प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे.
- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर
गदग-सोलापूर गाडीने दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, चाकरमानी, शेतकरी यांचा प्रवास आता एक्स्प्रेस झाल्यामुळे जलद होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून ही गाडी एक्स्प्रेस केल्याने चांगला निर्णय घेण्यात आला आहे.
- राजाभाऊ जाधव, अध्यक्ष, सोलापूर रेल्वे प्रवासी संघटना, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.