सोलापूर : गौडगाव खरकटणेसह माळशिरसचा मारुती प्रसिद्ध

धार्मिक पर्यटनाला संधी ; शनिवारी, अमावास्येला भाविकांची गर्दी
maruti temple
maruti templesakal
Updated on

सोलापूर : खरकटणे यासह माळशिरस येथील मारुती मंदिरे जिल्ह्यासह राज्यात प्रसिद्ध आहेत. या मंदिरांमुळे धार्मिक पर्यटनाच्या नवीन संधी जिल्ह्याला उपलब्ध होत आहेत.

गौडगाव मारुती मंदिर

गौडगाव येथील मारुती मंदिरात दर्शनासाठी मंगळवारी, शनिवारी व अमावास्या या दिवशी भाविकांची मोठी रीघ असते. समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या मारुती मंदिरांपैकी हे एक जागृत मंदिर आहे. संपूर्ण दक्षिणमुखी व हेमाडपंती मंदिर आहे. अलीकडच्या काळात प्रसिद्धीस पावलेले हे मंदिर आहे. ही मूर्ती एकमुखी, एकच डोळा असलेली आहे. शेपटीचे मूर्तीच्या शरीराभोवती वलय आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात एक विहीर आहे. या मंदिरात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरून अनेक भाविकांची येथे दर्शनाला अखंड गर्दी असते. अक्कलकोटला येणाऱ्या धार्मिक पर्यटकांची येथे वर्दळ असते. या मारुती मंदिरासह जिल्ह्यातील इतर मारुती मंदिरांचे योग्य मार्केटिंग झाल्यास जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन वाढण्यास मदत होईल.

खरकटणेतील पाच मारुती मंदिरे

तसे तर प्रत्येक गावात एक मारुतीचे मंदिर असते. मात्र सोलापूर जिल्ह्यात असे एक मारुती मंदिर आहे, तेथे गाव नाही पण मारुती मंदिर आहे. मोहोळ- वैराग रोडवर मलिकपेठ रेल्वे क्रॉसिंगजवळ खरकटणे (ता. मोहोळ) हे बेचिराख गाव आहे. खूप पूर्वी येथे लोकवस्ती होती. एका महिलेच्या शापामुळे येथील वस्ती निर्मनुष्य झाली, असे म्हटले जाते. येथील लोक मलिकपेठ तसेच शेजारील गावात राहावयास गेले. आज या ठिकाणी जुन्या घरांचे अवशेष आहेत. तसेच मारुती मंदिर व महादेव मंदिर आहे. लोकवस्ती नसलेल्या या गावातील मारुतीची ख्याती मोहोळ शहरात खूप मोठी आहे. प्रत्येक शनिवारी मोहोळसह परिसरातील नागरिकांची येथील मारुती मंदिरात दर्शनाला गर्दी होते. या गावातील साठे कुटुंबीय महाराष्ट्रभर विखुरले आहेत. ते आपल्या मूळ गावच्या मारुती मंदिराच्या दर्शनाला आवर्जून येतात.

माळशिरसचा झोपलेला मारुती

माळशिरस शहरात झोपलेल्या अवस्थेतील एक मारुती मंदिर आहे. पालखी मार्गावरील हे मारुती मंदिर असल्याने वारकरी संप्रदायामध्ये याची मोठी ख्याती आहे. एका आख्यायिकेनुसार संत तुकाराम महाराज वारीला जाताना माळशिरस मुक्कामी कीर्तन करत होते. हळूहळू सर्व श्रोते घरी गेले; मात्र मारुती तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकत होता. ‘सर्व भाविक झोपले आता तू पण झोप’ असे तुकाराम महाराजांनी मारुतीला सांगितल्याने हा मारुती झोपलेला आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आजही येथील मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे. वारीच्या काळात अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()