Solapur Girl Assault And Murder: निर्दयी बापाचा चिमुकलीवर आत्याचार आईचीही होती साथ; सोलापूर कोर्टाने 90 दिवसांत कशी दिली फाशी?

Solapur Girl Assault And Murder: ओरडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात कापड कोंबून त्याने अत्याचार केले होते. त्यावेळी चिमुकलीच्या आईने देखील बघ्याची भूमिका घेतली.
Solapur Girl Assault And Murder
Solapur Girl Assault And MurderEsakal
Updated on

सोलापूर : राजस्थानातून सिकंदराबाद येथे जगायला गेलेल्या धोलाराम बिष्णोई या निर्दयी बापानेच १३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केला होता. त्यावेळी पत्नी पुनिकुमारी हिने साथ दिली. या दोघांनाही फास्ट ट्रॅक कोर्ट नव्हे सोलापूरच्या पोक्सो विशेष कोर्टाचे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी फाशीची शिक्षा ठोठावली.

आरोपींना अवघ्या दोन महिने २८ दिवसांत शिक्षा होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी अथक परिश्रम घेतले होते. बदलापूर दुर्घटनेच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा न्यायालयात सर्वाधिक जलद चाललेल्या या खटल्याची सर्वांनाच आठवण झाली.

Solapur Girl Assault And Murder
Kolhapur Girl Assault And Murder: बदलापूरनंतर कोल्हापूर हादरलं! दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या

दारूच्या नशेत जन्मदात्या पित्यानेच १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. ओरडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात कापड कोंबून त्याने अत्याचार केले होते. त्यावेळी चिमुकलीच्या आईने देखील बघ्याची भूमिका घेतली. मुलीचा खून करून तिचा मृतदेह घेऊन दोघेही राजकोट-सिकंदराबाद एक्स्प्रेसने राजस्थानच्या दिशेने निघाले होते.

पण, रेल्वेच्या त्या डब्यातील एका महिला प्रवाशाने तिच्या जागेवर ठेवलेल्या मुलीला घ्यायला सांगितले. त्यावेळी त्या चिमुकलीचे दोन्ही हात लोंबकाळत असल्याने महिला प्रवाशाला संशय आला. त्यांनी प्रसंगावधान साधून तिकीट तपासणीस यांना माहिती सांगितली. त्यावेळी वाडी स्थानकाशी संपर्क करण्यात आला. तेथून सोलापूर स्थानकावर उतरल्यावर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले व चिमुकलीची वैद्यकीय तपासणी झाली. त्यावेळी ती मृत असल्याचे सांगितले. त्यावरून ४ जानेवारी २०२२ रोजी त्या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Solapur Girl Assault And Murder
6 Lakhs Maintenance: पत्नीने मागितली मासिक 6 लाखांची पोटगी; संतापलेल्या जज म्हणाल्या, "इतके पैसे हवे असतील तर..."

साधारणत: मार्चमध्ये हा खटला न्यायालयासमोर आला. त्यानंतर अवघ्या दोन महिने २८ दिवसांतच या गुन्ह्याचा निकाल लागला व निर्दयी बापासह त्या चिमुकलीच्या आईला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती.

अवघ्या ९ दिवसांत ३१ साक्षीदारांची तपासणी

क्रूर कृत्य करून पळून जाण्याच्या तयारीतील चिमुकलीच्या माता-पित्यांना कठोर शिक्षा व्हावी, म्हणून जिल्हा सरकारी वकील राजपूत यांनी कायद्याचा कस पाडला. त्यांनी अवघ्या ९ दिवसांतच गुन्ह्यातील ३१ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. मुख्य साक्षीदार महिला नेपाळची होती, त्यामुळे त्यांची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविण्यात आली. अखेर न्यायालयाने त्या दोन्ही आरोपींना तीन महिन्याच्या आत फाशीची शिक्षा ठोठावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.