सोलापूर : 'गोदुताई'च्या रस्त्यासाठी 'डीवायएफआय' आक्रमक! पोलिसांची तारांबळ
सोलापूर - डी.वाय.एफ.आय.चे कार्यकर्ते चालत गोदुताई परुळेकर नगर ते विजय नगर या मार्गावर मोर्चा काढला. घोषणाबाजी करत झेंडे घेऊन रस्ता रोखो धरून बसले आहेत.
दक्षिण सोलापूर येथील कुंभारी लगत माळरानावर वसलेली 50 हजार श्रमिकांची वसाहत कॉ. गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अथक परिश्रम आणि संघर्षातून ही वसाहत उभी राहिली. तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकारने हे विकासाचे मॉडेल म्हणून आंतरराष्ट्रीय परिषदेत याचे सादरीकरण केले. दस्तुरखुद्द पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या हस्ते 2006 साली लढाऊ विडी कामगारांना या घरांचे हस्तांतरण करण्यात आले.
संस्थेचे मुख्य प्रवतर्क तथा माजी आमदार ज्येष्ठ नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी आपल्या आमदारकीच्या कालखंडात या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिले. तेव्हापासून आजमितीस हा रस्ता दुर्लक्षित राहिला.
हा रस्ता म्हणजे अत्यंत असुरक्षित, अपघात प्रवण,मृत्यस निमंत्रण देणारे ,धोकादायक ठरला आहे.याचे गांभीर्य वारंवार सरकार , स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या पुढे निदर्शनास आणून दिले जात आहे.
तसेच हे नवीन ग्रामपंचायत स्थापन करून ग्रामपंचायतीच्या निकषाप्रमाणे सर्व स्थानिक व नागरी मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात यावे. हि मागणी सातत्याने सरकार आणि प्रशासनापुढे संस्थेच्यावतीने करण्यात आली. परंतु वेगवेगळ्या कारणास्तव व तांत्रिक अडचणी दाखवून ग्रामपंचायत स्थापनेचे काम प्रलंबित ठेवले. यामुळे या वसाहतीला शहरातून जोडलेला जो रस्ता आहे तो अत्यंत खराब झालेला आहे. विजय नगर पासून ते गोदुताई नगर क्रांती चौक हा २ कि.मी. चा रस्ता 2006पासून अद्याप त्याचे पुनःडांबरीकरण किंवा नव्याने रस्ता बनविला गेला नाही. त्यामुळे आजमितीस रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे असंख्य अपघात, अपघाती अपंगत्व आणि अपघाती मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले. हा रस्ता म्हणजे गोदुताई वसाहतीचा मुख्य रस्ता होता. पण आता ते मृत्यूच्या दाढेत नेणारा रस्ता होऊ पाहत आहे. याचे गांभीर्य जिल्हा परिषद प्रशासनाने घेणे आवश्यक असताना सुद्धा याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत आहे अशा नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.
सोमवार दि. 13 सप्टेंबर 2021 रोजी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने आपणास गोदुताई परुळेकर नगरला जोडणारा मुख्य रस्ता विजय नगर पासून ते गोदुताई नगर क्रांती चौक हा 2 कि.मी. तातडीने जिल्हा प्रशासनाच्या मार्फत नवीन रस्ता बनवावे. हि प्रमुख मागणी घेऊन युवा शिष्टमंडळाने निवेदन देऊन सदर विषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी आपण येत्या 23 सप्टेंबर ला होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये सदर प्रस्ताव मंजुरीस ठेवून पुढील कार्यवाही करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले. मात्र, पुढील कार्यवाही साठी अद्याप कोणत्याही सकारात्मक हालचाली प्रशासन मार्फत झालेले दिसत नाहीत.
सबब आपणास नम्र निवेदन आहे की, हा रस्ता म्हणजे 50 हजार लोकांच्या थेट जीवनमरणाशी निगडीत प्रश्न आहे.शहरातून येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. लोकांची वर्दळ,वाहतूक आणि रस्ता याचे कुठेच तारतम्य दिसून येत नाही. शासकीय व प्रशाकीय शिष्टाचार नुसार नवीन रस्ता तयार करण्यासाठी लागणारी प्रक्रिया राबवून संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नातून हा रस्ता निर्माण करण्यात यावे.
अन्यथा आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी व नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी लोकशाहीच्या दबावतंत्राचा योग्यपर्याय निवडावे लागेल.नंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासन आणि प्रशासन जबाबदार राहतील.याची नोंद घ्यावी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.