Solapur News : करमाळ्यात दुभंगलेल्या गर्भाशयाच्या पिशवीची यशस्वी शस्त्रक्रिया; डॉ. कविता कांबळे म्हणाल्या...

डॉ.कविता कांबळे यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर गर्भाशयाच्या पिशवीला आतून एक वेगळा पडदा असल्याचे निदर्शनास आले.
Solapur health Successful surgery ruptured uterine sac Karmala Dr. Kavita Kamble
Solapur health Successful surgery ruptured uterine sac Karmala Dr. Kavita Kamble Sakal
Updated on

करमाळा - करमाळा येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कविता कांबळे व डाॅ.स्वप्नील ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुभंगलेल्या गर्भपिशवीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले आहे.

येथील 25 वर्षीय विवाहितेला दबंगलेल्या पिशवीच्या अडचणीमुळे गर्भधारणा होण्यास अडचण येत होती. या महिलेने अनेक ठिकाणी उपचार घेऊनही गर्भधारणा होत नव्ह्ती. त्यानंतर संबंधित महीलेने

डॉ.कविता कांबळे यांच्याकडे उपचार घेतल्यानंतर गर्भाशयाच्या पिशवीला आतून एक वेगळा पडदा असल्याचे निदर्शनास आले.या पिशवीचे ऑपरेशन करण्याचा निर्णय संबंधित महिलेला समजावून सांगितल्यानंतर घेण्यात आला.

करमाळा कृष्णा हॉस्पिटल येथे प्रथमच दुर्बीणद्वारा ही शस्ञक्रिया यशस्वी करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती देताना स्त्रीरोगतज्ञ डॉ.कविता कांबळे म्हणाल्या,येथिल 25

वर्षीय विवाहितेच्या गर्भाशयाला आतून पूर्णपणे पडदा असल्यामुळे गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण होत होती.गर्भधारणा होण्यास वेळ लागत होता. त्यातूनही गर्भधारणा झाली तर तो गर्भ पूर्णपणे वाढत नव्हता.

Solapur health Successful surgery ruptured uterine sac Karmala Dr. Kavita Kamble
Solapur Crime : नात्याला काळीमा फासणारी घटना आजोबांने केला नातीवर अत्याचार

त्यामुळे 9 पुर्ण होण्याआधीच डिलिव्हरी होत होती.आणि यात ते बाळ जगत नव्हते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे यापुढे संबंधित महिलेच्या गर्भाशयात बाळाची व्यवस्थित वाढ होण्यास मदत होणार आहे.

करमाळ्यात ही शस्त्रक्रिया प्रथमच करण्यात आली आणि ती यशस्वी झाली याचा मनस्वी आनंद वाटतो. प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ कविता प्रमोद कांबळे आणी डॉ ढाकणे यांनी हे ऑपरेशन केले आहे. या साठी परंडा बार्शी येथील प्रसिद्ध भूल तज्ञ डॉ. गायकवाड यांनी पेशंट भूल दिली.डाॅ.बालाजी खटके यांनी यावेळी सहाय्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.