सोलापूर : तहसिलकडून नुकसानीची माहीती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे

वडाळा मंडळात सरासरी पेक्षा तब्बल 191 टक्के सर्वाधिक पाऊस
sakal impact
sakal impactsakal media
Updated on

वडाळा : उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या आठवडाभरात पावसाची अतिवृष्टी झाली. यामध्ये वडाळा रानमसले, कळमण, पडसाळी, कौठाळी ,गावडी दारफाळ, नान्नज - मोहीतेवाडीसह बहुतांश भागात शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.उत्तर सोलापूर तालुक्यात सध्या गेल्या महिन्यातभरात अधून - मधून पाऊस दमदार बरसला आहे .यामुळे कांदा ,सोयाबीन, उडीद, मका, तुर ,भाजीपाला , टोमॕटो ,ढोबळी मिरची आदी पिकांना सुरुवातीस पोषक वाटणारा पाऊस शनिवारी मात्र खरीप पिकांचा कर्दनकाळ ठरला आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे उत्तर तालुक्यात ओढे नाले बंधारे विहीरी तुटुंब भरले आहेत. याबाबत 'दै.सकाळ' ने सर्वप्रथम सविस्तर वृत्त देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न मांडला .यामुळे शेतकरी 'सकाळ'ला धन्यवाद देत आहेत. याबाबत तहसिलदार जयवंत पाटील यांनी 'सकाळ' च्या वृत्ताची दखल घेतली आहे. तहसिल कार्यालयाकडून प्राथमिक स्वरुपात माहीती संकलित केली आहे.तसेच उत्तर सोलापूर कृषि विभागाकडूनही अतिवृष्टीबाबत अहवाल मागविला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हाधिकारी कार्यालयास दुरध्वनी वरुन कळविली आहे. तरी येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकांर्याकडून नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे आदेश येण्याची शक्यता आहे.अशी माहीती तहसिलदार जयवंत पाटील यांनी 'सकाळ' शी बोलताना दिली.

sakal impact
राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय - नवाब मलिक

"गेल्या वर्षीप्रमाणे यंदाहीअतिवृष्टीमुळे कांदा सोयाबीन उडीद इतर खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तरी शासनाने त्वरीत पंचनामे करुन ठोस आर्थिक मदत द्यावी."

- रामचंद्र महादेव गरड, शेतकरी रानमसले ता. उ. सोलापूर

यंदा उत्तर तालुक्यात पावसाची तुफान बॕटिंग जून ते आॕगस्ट मध्ये सर्वच मंडाळात पावसाने सरासरी ओलांडली. शेळगी मंडलात सरासरीपेक्षा 112 टक्के अधिक ,मार्डी मंडलात सरासरी पेक्षा 125 टक्के अधिक, तिर्हे मंडलात सरासरी पेक्षा 107 टक्के अधिक , सोलापूर मंडलात 137 टक्के अधिक ,वडाळा मंडलात सरासरी पेक्षा 130 टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.

सप्टेंबर महिन्यात वडाळा मंडळात सर्वाधिक पाऊस

सप्टेंबर महिन्यात शेळगी मंडळात 15 टक्के कमी ,तिर्हे मंडळात सरासरी पेक्षा सरासरी पेक्षा 22 टक्के कमी पाऊस पडला आहे .सोलापूर मंडळात सरासरी नुसार तर मार्डी मंडळात सरासरी पेक्षा 35 टक्के अधिक पाऊस पडला असून वडाळा मंडळात सरासरीपेक्षा तब्बल 61 टक्के सर्वाधिक पाऊस बरसला आहे.उत्तर सोलापूर तालुक्यात एकूण सरासरी पेक्षा आतापर्यंत 123 टक्के पाऊस पडल्याची नोंद असल्याचे उत्तर सोलापूर तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी माहीती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.