इंदापूर : पुणे सोलापूर महामार्गावर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या इंदापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबध्द आहे. मात्र मंत्री म्हणून आपण मंजूर केलेल्या विकास कामांचा ज्यांचा काडीचा संबंध नाही, ते त्याचे उद्घाटन करत आहेत. त्यांना उद्घाटन करण्याचा नैतिक अधिकार नाही. असे प्रतिपादन करत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय तोफ विरोधकांवर डागली.
इंदापूर शहरातील अंबिकानगर व सरस्वतीनगर परिसरातून जाणाऱ्या ३३ के. व्ही. एच. टी. लाईन अंडरग्राऊंड करणे या १ कोटी २९ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. मंत्री भरणे पुढे म्हणाले, अंबिकानगर, सावतामाळी नगर येथील नागरिकांनी ३३ केव्ही लाईन भुयारी करण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, प्रभाग नगर सेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रयत्न केल्याने या कामास यश आले.कोरोना काळात शहरास निधी कमी पडू दिला नाही.
पूर्वीचे इंदापूर व सध्याच्या इंदापूर मध्ये फरक जाणवत असून रस्ते चकाचक तर विविधपुतळ्या मुळे शहर सौंदर्यात भर पडली आहे. प्रशासकीय भवन, न्यायालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग इमारतीमुळे शहर वैभव वाढले आहे. त्यामुळे शहराचा विकास कोण करत आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. शहर सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष तथा विद्युत वितरण सनियंत्रण समितीचे तालुकाध्यक्ष अतुल झगडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, महावितरणचे तालुका अभियंता रघुनाथ गोफणे, नगरसेवक पोपट शिंदे, स्वप्नील राऊत, अनिकेत वाघ, वसंत मालुंजकर, अनिल राऊत, महादेव शिंदे, सौरभ शिंदे, सागर मिसाळ, ऍड जालिंदर बसळे उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.