Solapur : अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविल्याने गेल्या साठ वर्षाचा विजेचा प्रश्न निकाली,शेतऱ्यात आनंद

मोहोळ येथील सुतार वस्ती परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता.
ट्रान्सफॉर्मर
ट्रान्सफॉर्मर sakal
Updated on

सकाळ : मोहोळ येथील "सुतार वस्ती" परिसरात अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविल्याने गेल्या 59 वर्षापासून चा या परिसरातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न कायम स्वरूपी निकालात निघाल्याने शेतकऱ्यात आनंद व्यक्त होत आहे.

ट्रान्सफॉर्मर
Solapur : संपूर्ण शहराला आता ४ दिवसाआड पाणी; पहाटे ४ ते दुपारी एक वाजेपर्यंत टप्पे; ‘झोन’ बाहेर लागणार वेळापत्रक

या संदर्भात अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील सुतार वस्ती परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे कष्टाने आणलेली चांगली विविध पिके, फळबागा जळून जात होत्या. या परिसरातील शेतकऱ्यांची गेल्या 59 वर्षापासून ची अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्याची सातत्याने मागणी होती. भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सतीश काळे यांनी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल केला होता.

सतीश काळे यांनी यासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. त्याला यश प्राप्त होऊन सुतार वस्ती येथे नवीन ट्रान्सफार्मर बसून तो शेतकरी ब्रह्मदेव देशमुख यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे या परिसरातील विजेचा प्रश्न मार्गी लागला असून सध्या सुरळीत विद्युत पुरवठा होत आहे.

ट्रान्सफॉर्मर
Solapur : संपूर्ण शहराला आता ४ दिवसाआड पाणी; पहाटे ४ ते दुपारी एक वाजेपर्यंत टप्पे; ‘झोन’ बाहेर लागणार वेळापत्रक

यावेळी शेतकरी ब्रह्मदेव भोसले यांनी शेतकऱ्यांना विजेचा काटकसरीने वापर करून वेळेवर वीज बिल भरण्याचे आवाहन केले. आमदार देशमुख व सतीश काळे यांच्या पाठ पुराव्यामुळे विजेचा प्रश्न निकाली निघाल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी संजीव खिलारे, धोंडीबा गायकवाड, पांडुरंग कदम, किरण देशमुख, शितल देशमुख, मदन लाळे, यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.