Solapur IT Park : सोलापूरचा चेहरा बदलण्यासाठी आयटी पार्क - शरद पवार

शरद पवार यांच्या हस्ते सोलापुरातील पहिल्या आयटी पार्कचे भूमिपूजन करण्यात आले.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Updated on

सोलापूर - सोलापूर ही कष्टकरी माणसांची भूमी आहे. कष्ट करण्यात सोलापूरकर कधीही मागे पडत नाहीत. सोलापूरचा चेहरा बदलण्यासाठी आता सोलापूरमध्ये आयटी पार्क सुरू होत आहे. आर्यन्स ग्रुपने सोलापूरकरांची साथ सोडू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केले.

शरद पवार यांच्या हस्ते सोलापुरातील पहिल्या आयटी पार्कचे भूमिपूजन आज (ता. १३) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उद्योजक अतुल चोरडिया, सतीश मगर, आर्यन ग्रुपचे मुकुंद जगताप, आर्यन ग्रुपच्या कार्यकारी संचालक स्मिता जगताप आदी उपस्थित होते. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी स्वागत केले. माजी महापौर महेश कोठे यांनी प्रास्ताविक केले.

प्रारंभी दीपप्रज्वलन व कुदळ मारून भूमिपूजन तसेच ह्युमनाईड रोबोट ‘स्व’चे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. मलकापुरे यांच्या ‘ए टू झेड क्रिकेट’ या पुस्तकाचे प्रकाशनही पार पडले.

श्री. पवार म्हणाले की, सोलापुरात एकेकाळी कापड उद्योग मोठ्या प्रमाणात होता. पुणे ही विद्यानगरी तर सोलापूरची ओखळ उद्योगनगरी अशी होती. काळ बदलला आणि पुणे विद्येबरोबरच उद्योगनगरी झाली. सोलापूर जिल्ह्याने साखर कारखानदारीत आघाडी घेतली. आज राज्यात सर्वाधिक कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. चित्रा खरे आणि श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालक केले. आभार महेश कोठे यांनी मानले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, निरीक्षक शेखर माने, माजी महापौर मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, नलिनी चंदेले, सुधीर खरटमल, शंकर पाटील, सुनीता रोटे, विद्या लोलगे, प्रमोद गायकवाड डॉ. सूर्यप्रकाश कोठे, विनायक कोंड्याल, शशिकांत कैची, कुंमूद अंकाराम यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

रोबोट नको रोजगार द्या

आयटी कंपनी जर सुरवातीलाच रोबोट तयार करू लागली तर येथील लोकांचा रोजगार हिरावला जातो की काय? असे येथील लोकांना वाटेल, असे शरद पवार यांनी सांगितले. यामुळे रोबोट तयार करण्यापेक्षा येथे भरपूर माणसे उपलब्ध आहेत त्यांना रोजगार द्या, असा सल्ला त्यांनी दिला.

क्षणचित्रे...

  • आर्यन्स ग्रुपतर्फे श्री सिद्धेश्वर देवस्थानाला दीड कोटींची देणगी

  • ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत

  • राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अनुपस्थिती

  • आयटी पार्कबाबतच्या चित्रफीत सादरीकरणात अनेकदा व्यत्यय

चिमणीच्या प्रश्‍नावर काडादींसोबत

सोलापूरच्या साखर उद्योगाबाबत बोलताना श्री. पवार म्हणाले, काडादी यांनी एक सहकारी साखर कारखाना काढला, पण त्यालाही आता काही अडचणी आहेत. त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. धर्मराज काडादी आणि त्यांचे सहकारी त्यादृष्टीने चिकाटीने लढत आहेत. तो कारखाना नीट कसा चालेल आणि चिमणीचा प्रश्‍न कसा सोडविता येईल, यात आम्ही लोकांनी लक्ष घातले आहे, अशा शब्दांत चिमणीच्या प्रश्‍नावर आपण काडादी यांच्यासोबत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

आमदारकी तर पाहिजेच पण आयटी पार्कही हवाच - महेश कोठे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत सांगताना महेश कोठे म्हणाले की, आम्हाला आमदारकी तर पाहिजेच आहे; पण त्याचबरोबर सोलापूरला आयटी पार्क मिळावा, अशी अपेक्षा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावेळी व्यक्त केली होती. त्यावेळी शरद पवार यांनी सांगितलं होतं की, मी आता तुम्हाला एमएलसी (विधान परिषद सदस्यत्व) देऊ शकत नाही. पण, तुम्ही तयारी करा; आम्ही सर्व ताकद तुमच्या पाठीशी लावू, असा शब्द मला पवार यांनी दिला होता, असे महेश कोठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.