Solapur : जयंत पाटलांनी उपस्थितांना थेट विचारले आमदार संजयमामा शिंदे उपस्थित आहेत का?

महापुरुषांचा राज्यात सतत अवमान करून वादग्रस्त विधाने केली जात
Ncp
Ncpsakal
Updated on

सोलापूर : करमाळा शहर व तालुका राष्ट्रवादीच्यावतीने ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ शिबिर झाले. या शिबिराला जिल्ह्यातील प्रमुख नेते गैरहजर होते. त्याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘ज्यांना विचाराची काही देवाणघेवाण करायचे नसते’ असे ते म्हणाले. तर आमदार संजयामामा शिंदे उपस्थित आहेत का? असेही त्यांनी विचारले.

करमाळा शहर व तालुका राष्ट्रवादीच्या वतीने करमाळा येथील आमदार संजय शिंदे यांचे संपर्क कार्यालय येथे ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ हे शिबिर झाले. या शिबिराला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ‘व्हीसी’द्वारे (व्हिडिओ कॉल) उपस्थित होते. त्यांनी सुमारे सात मिनिटे उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुरुवातीलाच त्यांनी जिल्ह्यातील नेते उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘ज्यांना विचाराची देवाणघेवाण करायची नसते ते गैरहजर राहतात’, असे त्यावर ते म्हणाले.

मुंबई ते नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली. याचे बरेचसे काम महाविकास आघाडीच्या काळात झाले मात्र त्याचे श्रेय हे सरकार घेत आहे, असे ते म्हणाले. महापुरुषांचा राज्यात सतत अवमान करून वादग्रस्त विधाने केली जात आहेत, असे म्हणत यावरही त्यांनी जोरदार टीका केली. शेवटी आमदार संजयामामा शिंदे कार्यक्रमाला उपस्थित आहेत का? असे त्यांनी उपस्थितांना विचारले. तेव्हा ते नसल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, भोजराज सुरवसे, अभिषेक आव्हाड, सचिन नलवडे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी महिला पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षा कविता म्हेत्रे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.