करमाळा - करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत स्वाभिमानी शिक्षक पॅनलने गुरुसेवा शिक्षक पॅनल चा पराभव केला आहे स्वाभिमानी शिक्षक पॅनलचे दहा संचालक निवडून आले आहेत तर विरोधी गुरु सेवा पॅनलचा केवळ एक संचालक निवडून आला आहे करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक पस्थ होते वरती निर्विवाद वर्चस्व मिळवला आहे.
रविवार ता.8 ऑक्टोंबर रोजी मतदान होत आहे झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी सुरुवात झाली मतमोजणी झाल्यानंतर स्वाभिमानी शिक्षक पॅनलचे दहा तर गुरुसेवा पॅनल चा एक उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप तिजोरे यांनी जाहीर केले स्वाभिमानी शिक्षक पॅनलने विजय आनंद उत्सव साजरा केला गुलाल फटाके पेढे वाटून स्वाभिमानी शिक्षक पॅनलने हा आनंदोत्सव साजरा केला.
ता.2 जुलै रोजी या पतसंस्थेचे मतदान होणार होते.माञ शासनाने जाहीर झालेल्या व होणा-या निवडणूका पुढे ढकलण्याने करमाळा तालुका शिक्षक सह.पतसंस्थेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.यावेळी स्वाभिमानी शिक्षक पॅनल विरुद्ध गुरुसेवा शिक्षक पॅनल असे दोन शिक्षकांचे गट एकमेंकासमोर निवडणूक लढवत होते.करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची एकुण सभासद संख्या 762 माञ
मतदान साठी 585 सभासद पाञ झाले आहेत.
थकबाकीदार असल्थाने अनेक सभासदांना मतदान करता आले नाही. या पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 2 कोटी पेक्षा जास्त आहे.कर्जमर्यादा 7.50 लाख आहे.तर व्याजदर 7.20 वार्षिक टक्के आहे. सध्या या पतसंस्थेवर स्वाभिमानी शिक्षक परिवाराची सत्ता होती. सलग दुसऱ्यांदा शिक्षक पॅनलची सत्ता आली आहे
या प्रक्रियेत स्वाभिमानी शिक्षक परिवार पॅनलचे विजयी झालेले उमेदवार व त्यांना झालेले मतदान पुढील प्रमाणे.
अरुण चौगुले(413), ततात्यासाहेब जाधव(369), प्रताप काळे(246), अजित कणसे (382), निशांत खारगे(430), पूनम जाधव(296), वैशाली महाजन(327), सतीश चिंदे(328), साईनाथ देवकर(418), आदिनाथ देवकते(304) तर त्यांच्या विरोधात गुरुसेवा शिक्षक पॅनल मधून हनुमंत सरडे (265)हे उमेदवार विजयी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.