Narasayya Adam: उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे... PM मोंदीच्या मंचावर भाषणात सोलापूरच्या आमदाराचा गोंधळ, उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

Narasayya Adam: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगार, कष्टकरी जनतेचे घरकुलाचे स्वप्न साकार होत आहे. यावेळी कामगार नेते आडम मास्तरांनी मोदींच्या कामांचं कौतुक केलं तर काही विनंत्या देखील केल्या आहेत.
Narasayya Adam
Narasayya AdamEsakal
Updated on

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगार, कष्टकरी जनतेचे घरकुलाचे स्वप्न साकार होत आहे. आज हजारो कामगार ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्रीगण उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार नरसय्या आडम यांच्या भाषणाने झाली.

मात्र, आडम यांच्या भाषणाच्या सुरुवातीनेच अनेकांच्या भुवया उंचावल्या. आडम यांनी भाषणात उपमुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला. मात्र आपली चूक लक्षात येताच आडम यांनी आपली चूक सुधारली. आडम यांनी देवेंद्र फडणवीस यांची मंचावरुनच माफी देखील मागितली.

या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत सोलापूरचे ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलं. यावेळी बोलताना नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले त्याचबरोबर त्यांचं कौतुकही केलं आहे. तर पंतप्रधान मोदी दिलेल्या शब्दाला जागले म्हणत आज सोलापुरात दिवाळी आणि रमजान साजरा होत आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तर त्यांनी काही विनंत्याही केल्या आहेत.

Narasayya Adam
PM Modi Solapur Visit: मला ही अशा घरी राहायला मिळालं असतं तर... कामगारांच्या घराचं उद्घाटन करताना मोदींच्या डोळ्यात अश्रू

राज्य शासनामार्फत प्रकल्पाला सोलार बसवा त्यामुळे वीज बील कमी होईल. १ टक्के लेबर सेस कमी करा, विडी कामगार वस्तीमध्ये चांगले रस्ते, ड्रेनेज लाईनची चांगली व्यवस्था करा. त्याचबरोबर असंघटीत कामगारांना १० हजार रूपये पेन्शन द्या अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली आहे.

आज आनंद होत आहे. १५ हजार घरांची चावी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून इथे आले आहेत. मोदींनी करामत करुन दाखवली आहे. पाण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे गेलो महिन्याभरात सोडवतो म्हणाले त्यांनी पाणी दिलं.

Narasayya Adam
Pandharpur : चंद्रभागा नदी शुद्धीकरणाचे काम ‘नमामि चंद्रभागा’तून हाती घेण्यात आले असून तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा

लेबर सेसमुळे १५ हजारांनी घराची किंमत वाढते, केंद्रातले लेबर मिनिस्टर तयार नाहीत, लेबर सेस १ टक्क्याने कमी करा. शेजारी ५० हजारांची वस्ती आहे तिथे रस्ते ड्रेनेज नाही, तिथले लोक विचारतात. सहा निवेदनं दिली आहेत त्याबाबत लवकर निर्णय व्हावा.

देशात ६७ लाख लोक निवृत्त झाले आहेत, त्यांना पेन्शन मिळते. कोठारी कमिटीचा रिपोर्ट येऊन असंघटित कामगारांना देखील १० हजारांची पेन्शन द्यावी अशी विनंती यावेळी आडम यांनी केली आहे.

Narasayya Adam
Sharad Pawar Solapur Visit: शरद पवार अन्‌ नरेंद्र मोदी एकाच दिवशी सोलापूर दौऱ्यावर; घडामोडींना वेग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.