विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोहोळ शहरात गस्त घालत होते. यावेळी विना नंबर प्लेटच्या स्कुटी वरून दोन तरुण निघाले होते. संशय आल्याने पोलिसांनी गाडी थांबवून त्या दोन युवकांकडे चौकशी करून गाडीची झडती घेतली.
यावेळी त्याच्या डिक्की मध्ये एक लाख 42 हजार रुपये रोकड मिळून आली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर कारवाई करत रक्कम जप्त केली. ही घटना ता 6 नोव्हेंबर रोजी मोहोळ ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेल समोर घडली.