माळशिरस (सोलापूर) : माळशिरस पोलिसांनी अट्टल दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी रिव्हॉल्वर, चाकू, बोलेरो गाडीसह आठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने धुळे, नाशिक, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यात घरफोडीचे अनेक गुन्हे केले आहेत. येथील पोलिस ठाण्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. नाशिक, गंगापूर व औरंगाबाद येथील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एकजण फरार आहे.
माळशिरस पोलिसांना गोपनी माहिती मिळाली की, शिंगोर्णी (ता.माळशिरस) गावात एक चॉकलेटी रंगाची बोलेरो व त्यामध्ये तीन इसम संशयितरित्या फिरत आहेत. त्यानंतर माळशिरसचे पोलिस निरीक्षक दिपरत्न गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन घोळकर व पोलिस कर्मचारी यांनी नरळेवस्ती (शिंगोर्णी) येथे सापळा लावला व बोलेरो गाडी ताब्यात घेत असताना गाडीतील एक आरोपी पळून गेला तर दोन आरोपींना ताब्यात घेतले.
त्यावेळी गाडीत एक गावठी पिस्तुल, एक चाकू, दोन कापडाच्या गोण्या त्यात शर्ट पॅन्ट, लहान मुलांचे कपडे एक लोखंडी कटावणी, एक कोयता मिळून आला. ही बोलेरो क्र.एम.एच.14/ए.झेड.7898 जप्त केली असून आरोपीकडे चौकशी केली असता नंबर बनावट गाडी चोरीची आहे, त्याचा गुन्हा देवपूर (जि.धुळे) या पोलिस ठाण्यात नोंद आहे. तसेच गाडीत सापडलेले कपडे हे दिघंजी (ता.आटपाडी) येथील जयभवानी कलेक्शनमधील चोरीचे असल्याचे सांगितले. तसेच आरोपींनी चोरून आणलेली एक बुलेट मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. ही मोटारसायकल निफाड (जि.नाशिक) येथून चोरी केल्याचे उघडकीस झाले आहे. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून यातील एक आरोपीला तीन वर्ष शिक्षा झालेली आहे.
या आरोपींनी पकडण्याची कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव, अकलूजचे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे, माळशिरस पोलिस निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन घोळकर, पो.कॉ. दत्ता खरात, मारुती शिंदे, तुळशीराम गायकवाड, पंडित मिसाळ, सुशील साळुंखे, वैभव लेंडवे, राहुल वाघ, सोमनाथ माने, सतीश धुमाळ, अन्वर आतार व होमगार्ड संतोष शिंदे यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.