Solapur News : मंगळवेढासह जिल्ह्यात काँग्रेसला अच्छे दिन येणार - तालुकाध्यक्ष प्रशांत साळे

कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसला अच्छे दिन आले. त्याचे पडसाद आता देशभर उमटणार असून मंगळवेढासह जिल्ह्यात काँग्रेसला अच्छे दिन येणार.
Prashant Sale Solapur News
Prashant Sale Solapur Newssakal
Updated on

भोसे - कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेसला अच्छे दिन आले. त्याचे पडसाद आता देशभर उमटणार असून मंगळवेढासह जिल्ह्यात काँग्रेसला अच्छे दिन येणार असल्याचा दावा अध्यक्ष प्रशांत साळे यांनी केला.

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे व जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवल सिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध उपक्रम व आंदोलने काँग्रेस पक्षाकडून सातत्याने घेतली.

तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खा. राहुल गांधी वर केलेल्या अन्यायावर जयभारत सत्याग्रह सभा हुन्नूर येथे घेतली. तसेच तालुक्यातून पाच हजार एक पोस्ट कार्ड पंतप्रधानाना पाठवली.

केंद्रातील भाजप सरकारकडून जनतेच्या पैशाची अदानी सारख्या मोठ्या उद्योगपती वरती कशी उधळण करत या आर्थिक घोटाळ्या बाबत मंगळवेढ्यातील स्टेट बँकेसमोर सर्व काँग्रेस पक्षातील जेष्ठ कनिष्ठ कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन निदर्शने देखील केली.

भारत जोडो यात्रेत सलग तीन दिवस अकोला येथे जाऊन तालुक्यातील कार्यकर्त्या समवेत सहभाग नोंदवला.

Prashant Sale Solapur News
Solapur News : कलावंतच जनतेचे प्रश्न मांडू शकतात प्राध्यापक सुरेश शिंदे

तालुक्यात जेष्ठांचे मार्गदर्शनाखाली व युवकांना सोबत घेऊन अतिशय जोमाने कार्य सुरू आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी बैठका देखील घेतल्या. कर्नाटक निकालावर जल्लोष देखील केला परंतु काही लोकांकडून विनाकारण गैरसमज पसरविले जात आहेत.

वास्तविक काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करणारे आज माझ्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करीत आहेत.

सर्वजण एकत्र काम करत असून सुशीलकुमार शिंदे व जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी देखील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नवीन पिढीतील युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी कार्य करण्याचा सल्ला दिला. याचा फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला होणार आहे, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

Prashant Sale Solapur News
Solapur News : पशुखाद्य व चाऱ्याचे दर गगणाला भिडल्याने मोहोळ तालुक्यातील दुध उत्पादक अडचणीत

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दलित मित्र बाबासाहेब साळे यांच्यासह काँग्रेस पक्षास अत्यंत अडचणीच्या काळात तिसरी पिढीने योगदान दिले.

तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडताना आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला गत वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- प्रशांत साळे, तालुकाध्यक्ष काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()