सोलापूर : रखडलेल्या 31 प्रश्नावर आ. अवताडेची लक्षवेधी, पहिल्या प्रश्नात सरशी

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस 7 दिवसात मंजूर करण्याबाबत शब्द जलसंपदामंत्र्याकडून घेतला
samadhan autade
samadhan autade
Updated on

मंगळवेढा :- तालुक्यासह जिल्हयातील विविध कार्यालयाशी संबधित असलेल्या 31 रखडलेल्या प्रश्‍नाची आ समाधान आवताडे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावली. त्यात बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस 7 दिवसात मंजूर करण्याबाबत शब्द जलसंपदामंत्र्याकडून घेतला.

जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.समाधान आवताडे यांच्या पोटनिवडणुकीतील प्रचारा दरम्यान मंगळवेढा येथे या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत विरोधी पक्षनेते असताना शब्द दिला होता आता ते सत्तेत आल्यानंतर दिलेल्या शब्दाचे त्यांनी पालन केले मंगळवेढयातील प्रमुख प्रश्‍नावर सकाळ ने ही लक्ष वेधले होते त्या प्रश्‍नाचाही या लक्षवेधीत समावेश आहे.

याबाबत माहिती देताना आ. आवताडे म्हणाले की पंढरपूर व मंगळवेढा या मतदारसंघातील जनतेला भेडसावणाय्रा प्रश्‍नाबरोबर जिल्हयातील विविध प्रश्‍नावर शासनाचे लक्ष वेधून घेण्याबरोबर ते प्रश्‍न सोडवण्याचे दृष्टीने यंदाच्या अधिवेशनात महसूल,कृषी,पाणीपुरवठा,परिवहन,ग्रामविकास,ऊर्जा,उच्च शिक्षण,सार्वजनिक आरोग्य,अन्न नागरी पुरवठा,जलसंपदा,मदत पुर्नवसन,सामाजिक न्याय,शालेय शिक्षण,पर्यटन,व मुख्यमंत्री कार्यालयाशी संबधित असलेल्या विभागाकडे प्रलंबित असलेले प्रश्‍न उपस्थित केले,त्यामध्ये 21 हजार 615 ग्रंथालय कर्मचाय्रा थकीत वेतन,पंढरपूरात संतपीठ उभारणी,जिल्हयातील बेकायदा वाळू उपशा,महाराष्ट्र केसरी व आंतराष्ट्रीय कुस्तीगिराचे रखडलेले मानधन,गटविकास अधिकारी पदोन्नतीतील अनियमितता,सोलापूर प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालयातील निश्क्रीयता,राज्यातील प्रशासकीय कार्यालयात रिक्त असलेली 2 लाख 3 हजार रिक्त पदे भरणे, शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्या गैरव्यवहराबाबत,लॉकडाऊन काळात महावितरणे विज वसुली करुनही सुरक्षा ठेवच्या नावाखाली वसुली केलेबाबत,पंढरपूरातील यमाई तलाव परिसरात बौध्दविहार उभारणेबाबत,महात्मा फुले योजनेतील जिल्हा व तालुक्यातील उपलब्ध बेडची माहिती मिळत नाही.

उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील एजंटाकडून होणारी लुट,आदी प्रश्‍नाबरोबर गतवर्षीच्या हिवाळी अधिवेशनात पंढरपूर व मंगळवेढयातील दारु,जुगार,वाळू तस्करीबाबत पुन्हा लक्षवेधी केली याशिवाय बंद असलेली भोसे व आंधळगाव प्रादेशीक पाणीपुरवठा योजना सुरु होणेबाबत,रखडलेले महात्मा बसवेश्‍वर स्मारक,माचणूर व मंगळवेढा या ऐताहासीक किल्ल्याची दुरुस्ती,अन्नसुरक्षा योजनेत वंचीत नव्या कार्डधारक लाभार्थ्याचा समावेश करणे,ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण भागातील मृताचे शवविच्छेदनास केलेली टाळाटाळ,तीन वर्षे प्रलंबित ठेवलेल्या 38 कोटी छावणीचालकाच्या थकीत बिलाबाबत,ग्रामीण रुग्णालयातील बेड संख्या वाढविणे,पौट साठवण तलाव मंजुरी बाबतचा प्रश्‍नाबाबत यंदाच्या अधिवेशानात आ आवताडे यांनी लावली.

आ.आवताडे आमदार झाल्यानंतर एक वर्षात राज्यात सत्ताबदल झाला.सत्ताधारी पक्षाचे आमदार झाल्याने मतदारसंघात विविध विकासकामासाठी कोटयावधीचा निधी मिळविला असताना हे सत्ताधारी पक्षात असल्याने रखडलेल्या प्रश्नाबाबत लावलेल्या लक्षवेधीत आज मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस हिरवा कंदील घेतल्याने इतर प्रश्‍नालाही न्याय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सामाजिक बांधीलकी जपण्यात अग्रेसर असलेल्या दै सकाळने तालुक्यात पोस्टमार्टेमची गैरसोय मी नातेवाईकांची हेळसांड,बंद भोसे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना जनते ऐवजी ठेकेदारासाठीच,मंगळवेढा उपसासिंचन योजना,15 हजार कार्डधारक अन्नसुरक्षा योजनेपासून वंचीत,थकीत छावणीचालकाची बिले,एैतीहासीक किल्ला दुरुस्ती,महात्मा बसवेश्‍वर स्मारक,आदी प्रश्‍नावर सातत्याने आवाज उठविण्याचा प्रयत्न केला त्या प्रश्नाचीही आ.आवताडे यांनी दखल घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.