भोंदू मनोहरमामा करमाळा तुरुंगात ! सोमवारी करणार न्यायालयात हजर

उंदरगाव (ता. करमाळा) येथील मनोहरमामा भोसले यांच्यावर करमाळा पोलिस बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
manohar bhosale
manohar bhosalesakal
Updated on

करमाळा : उंदरगाव (ता. करमाळा) येथील  मनोहरमामा भोसले यांच्यावर करमाळा पोलिस बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्हात हवा असलेला संशयित आरोपी मनोहर भोसले यास करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी बारामती न्यायालयात आपली बाजु मांडून तब्यात घेतले आहे. बारामती न्यायालयातुन करमाळा पोलीसांना दुपारी 1 वाजता भोसले ताब्यात मिळाल्यावर पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे हे मनोहरमामा ला करमाळयात घेऊन आले. दुपारी 3 वाजता करमाळा येथिल उपजिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी  केल्यानंतर त्यानंतर मनोहरमामा भोसले यास करमाळा येथिल तरूगांत ठेवण्यात आले. सोमवारी ता.20 रोजी मनोहरमामा भोसले यास  करमाळा न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.

करमाळा पोलीस कार्यालयात 9 सप्टेंबरला मनोहरमामा  भोसले व याचे दोन साथीदार विरूध्द  बलात्काराचा गुन्हा  दाखल झाला होता.  त्याच दिवशी बारामती पोलीसातही फसवणूक व बुवाबाजी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान 10 सप्टेंबरला पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी सालपे ता.लोणंद, जि.सातारा येथील एका  फार्म हाऊस वर लपून बसलेल्या भोसलेला ताब्यात घेतले व बारामती पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर भोसलेला प्रथम पाच दिवस व नंतर तीन पोलीस कोठडी दिली होती. मनोहर भोसले याच्यासह तिघांवर बलात्काराच्या गुन्हासह अंधश्रद्धा निर्मुलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मनोहर मामा भोसले महाराजांचे गेली महिन्याभरापासून प्रकरण गाजत असुन दिवसेंदिवस त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होते आहेत.त्याच गुरुवार ता.9 रोजी करमाळा पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता .या दिवशी बारामती येथे भोसले विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला.या गुन्हात पुणे पोलिसांनी मनोहर भोसले यास अटक केली .सध्या तो बारामती पोलिसांच्या ताब्यात होता.

manohar bhosale
पुणे : कोथरुडमध्ये विसर्जन स्थळी गर्दीला उधाण

बारामती न्यायालयाची आज(ता.19)  मनोहरमामा भोसले ची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे स्वतः बारामती न्यायालयात गेले होते. त्यांनी करमाळा पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील तपासकामी मनोहरमामा भोसलेची मागणी केली त्यानुसार बारामती न्यायालयाने मान्यता दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस उपनिरिक्षक साने, पोलिस देवकर, ढवळे, पवार आदी सहकार्यानी मनोहरमामा भोसले यास करमाळयात  आणले. त्याची वैद्यकीय तपासणी येथील उपजिल्हा रूणालयात करून  त्याची जेलमध्ये रवानगी केली.डाॅ. तुषार नाळे यांनी मनोहर भोसले यांची वैद्यकीय तपासणी केली.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ. विशाल हिरे उपस्थित होते. सोमवार  (ता.20) करमाळा येथील न्यायालयात मनोहरमामा भोसले यास हजर केले जाणार  असुन न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे अशी माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ. विशाल हिरे यांनी दिली.

manohar bhosale
महाबळेश्वरातील म्हाळुंगेत रान गव्याच्या हल्यात महिला जखमी

दरम्यान, मनोहर भोसले याच्यावर करमाळा पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्याचा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे, त्यामुळे आज बारामती न्यायालयासमोर भोसले यांच्या वकिलाच्या वतीने भोसले यास न्यायालयीन कोठडी न देता पोलिस कोठडीतच ठेवण्यात यावे अशी मागणी त्याच्या वकिलांकडून करण्यात अाली  .यासाठी भोसले यांच्या वतीने मोठी वकिलांची टीम उभी करण्यात आली होती  .मात्र या वकिलाच्या टीमसमोर करमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडत  भोसले यास कशा पध्दतीने करमाळा पोलिसांच्या ताब्यात देणे गरजेचे आहे हे पटवून दिले  .यानंतर न्यायाधीशांनी भोसले याची पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली त्यामुळे पोळी करमाळा पोलिसांना भोसले याचा ताबा घेणे सोपे झाले  .

भोसले यास पोलिस कोठडीत ठेवून येत्या दोन ते तीन दिवसांत प्रयत्न करून मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर करून घ्यायचा  असा प्रयत्न भोसले यांच्या वकिलांचा होता. मात्र हा प्रयत्न फसला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.