सोलापूर बाजार समितीची निवडणूक मे-जूनमध्ये? ‘डीडीआर’चे सहकार प्राधिकरणाला पत्र; अर्हता दिनांक कळविण्याची मागणी

सोलापूर बाजार समितीच्या संचालकांची मुदत १४ जानेवारीला संपणार आहे. पण, लोकसभा निवडणुकीमुळे समितीच्या नूतन संचालकांची निवडणूक १४ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या दरम्यान होणार की लोकसभा स्थापन झाल्यानंतर मे-जूनमध्ये होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
apmc solapur
apmc solapursakal
Updated on

सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मुदत आता १४ जानेवारी २०२४ रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी अर्हता दिनांक कळवावा, असे पत्र त्यांनी सहकार प्राधिकरणाला पाठविले आहे.

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या खर्चापोटी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने समितीकडून दहा लाखांचा धनादेश घेतला आहे. राज्याचे सरकार बदलले पण, यंदा बाजार समिती निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार नसणार आहे.

प्रचलित पद्धतीनुसार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायट्यांचे सदस्य, बाजार समितीतील हमाल-तोलार व व्यापारी मतदार असणार आहेत. दरम्यान, बाजार समितीच्या संचालकांची मुदत यापूर्वीच संपली असून त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत आता १४ जानेवारीला संपणार असल्याने तीन महिने अगोदर निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सहकार प्राधिकरणाकडून मतदार यादी तयार करण्यासाठी अर्हता दिनांक कळविला जाणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

लोकसभेनंतर बाजार समितीची निवडणूक?

आगामी लोकसभेची निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होईल. त्यासाठी फेब्रुवारीअखेरीस आचारसंहितेची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे सोलापूर बाजार समितीच्या संचालकांची मुदत १४ जानेवारीला संपणार आहे. पण, लोकसभा निवडणुकीमुळे बाजार समितीच्या नूतन संचालकांची निवडणूक प्रक्रिया १४ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या दरम्यान होणार की लोकसभा स्थापन झाल्यानंतर मे-जूनमध्ये होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.