Solapur Mahanagarpalika : सोळा दशलक्ष लिटर पाण्याचे नुकसान ; सोलापुर महानगरपालिकेने केला गुन्हा दाखल

पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन वर बोअर मारून 16 दशलक्ष लिटर पाण्याचे व सार्वजनिक मालमत्तेचे आठ लाख रुपयाचे नुकसान करून, विद्रुपीकरण केल्या प्रकरणी एका हॉटेल चालकावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Solapur Mahanagarpalika
Solapur Mahanagarpalikasakal
Updated on

मोहोळ : पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन वर बोअर मारून 16 दशलक्ष लिटर पाण्याचे व सार्वजनिक मालमत्तेचे आठ लाख रुपयाचे नुकसान करून, विद्रुपीकरण केल्या प्रकरणी एका हॉटेल चालकावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील यावली शिवारात घडली.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर यावली शिवारात हॉटेल साई सिद्धेश्वर आहे. सदर हॉटेलच्या चालकाने उजनी ते सोलापूर जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन वर बोअर मारून 16 दशलक्ष लिटर पाण्याचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे आठ लाख रुपयाचे नुकसान करून त्याचे विद्रूपीकरण केले,तसेच पाण्याची दिशा बदलून त्याची आगळीक केली.

Solapur Mahanagarpalika
Solapur News : धनादेश अनादरप्रकरणी दंडासह एक वर्षाची शिक्षा

या प्रकरणी सतीश वसंतराव एकबोटे वय 54 सहाय्यक अभियंता पाणीपुरवठा विभाग सोलापूर महानगरपालिका रा सोलापूर यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे. तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.