सोलापूर : दूध पंढरी कर्मचारी पतसंस्थेला १५ लाख रुपयांचा नफा

चेअरमन पाटील : सभासदांना पाच टक्के लाभांश
Milk
Milksakal
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्थेला १५ लाखांचा नफा झाला आहे. सभासदांना पाच टक्के लाभांश दिला जाणार आहे. पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने झाली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

यावेळी दूध संघाचे प्रशासक शिवराम पापळ, माजी संचालक शिवाजी नागणे, दूध संघाचे व्यवस्थापक नितीन बनगर, दूध संकलन अधिकारी विजयकुमार भडंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या वर्षभरात ६५ सभासदांनी राजीनामा दिला आहे. सभसदांच्या घटत्या संख्येमुळे पतसंस्थेचे गतवर्षीच्या तुलनेत १९ टक्‍क्‍यांनी भागभांडवल कपात झाले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याची माहिती चेअरमन पाटील यांनी दिली. सभासद कल्याण निधी योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरात पतसंस्थेने सभासदांना उपचाराकरिता विनापरतीच्या तत्वावर ४७ हजार रुपयांची मदत केली आहे.

Milk
पदपथावरच रात्र अन् मिळेल ते खाणार; पोलिस भरतीच्या उमेदवारांची व्यथा

या योजनेतून आतापर्यंत १८६ सभासदांना नऊ लाख रुपयांची मदत केली आहे. पतसंस्थेचे व्यवस्थापक अभिमान शिनगारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिंदे व्हाईस चेअरमन शिवाजी जाधव, संचालक आर. जी. शिंदे, सलीम शेख, धनरज देवकर, दिनेश जाधव, तानाजी नकाते, ज्योतीराम वजाळे, शांतिनाथ कोळी, बाळासाहेब शिंदे, तुकाराम भोसले, हनुमंत व्यवहारे, सुजाता कांबळे, शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते. सभेच्या कामकाजात विनायक कदम, आर. डी. हाके, राजेंद्र भोंग, सुनील भांगे, अनिल शिंदे, श्रीकांत चौगुले यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. सभेच्या यशस्वीतेसाठी संगणक विभागाचे प्रशांत काळे, जेट सोल्युशनचे श्रीनाथ मिरानम, पतसंस्थेचे कर्मचारी सुधाकर ताकतोडे, वंदना माने यांनी परिश्रम घेतले.

थकबाकी वसुलीसाठी विविध कायदेशीर मार्गाने प्रयत्न केले जाणार आहेत. काही सभासदांनी निवृत्तीनंतरही सभासदत्व कायम ठेवण्याची विनंती केली आहे. संस्थेचे एकंदर व्यवहार, उलाढाल कमी होत असल्याने संस्थेचे अस्तित्व टिकविण्यासाठी कर्मचारी पतसंस्थेचे रुपांतर नागरी पतसंस्थेत करणे आवश्‍यक आहे.

- बी. एन. पाटील, चेअरमन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()