Solapur : महामंडळाच्या योजनेचा अल्पसंख्याक समाजाने लाभ घ्यावा आ.आवताडे

भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त महामंडळाच्या व्यावसायिक कर्ज योजनेसंदर्भात मार्गदर्शन शिबिर
Solapur
Solapuresakal
Updated on

मंगळवेढा : अल्पसंख्याक समाजातील तरुणांनी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक व उद्योग कर्ज योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. समाधान आवताडे यांनी केले.भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त महामंडळाच्या व्यावसायिक कर्ज योजनेसंदर्भात मार्गदर्शन शिबिर शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्नाखाली आदित्य हिंदुस्तानी व शशिकला मुदगुल यांनी शनिवार पेठ येथे आयोजित करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते

Solapur
Travel News : सगळीकडे फिरून झालं आता कुटुंबसह ही ट्रीप एन्जॉय करा, वाचा खर्च अन् ठिकाण

त्यावेळी भाजपा जिल्हा संघटक सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, लेबर फेडरेशन चे संचालक सरोज काझी, आझाद दारुवाले, जिल्हा युवा मोर्चा चे सुदर्शन यादव, सुशांत हजारे , बाबा कौंडुभैरी, शिवाजी जाधव, सुरेश मेटकरी,झाकिर तांबोळी, शबिर रोंगिकर, झाकिर रोंगिकर, रियाज शेख, सोहेल रोंगिकर, शफिक बोकारि, शाबान शेख, आरिफ तांबोळी, जावेद सुतार, तनविर मनेरी , राहिल जमादार, सुलेमान रोंगिकर, सरफराज गोरी, अलताफ शेख, अफताब बोकारि, शरिफ शेख, जाविर तांबोळी, रेहान जमादार, गब्बर बोकारी, तय्ब गोरी, जुबेर रोंगिकर, अक्षय मुदगुल, सतिश मुदगुल उपस्थित होते.

Solapur
Health Blog: त्रिकोणासन;हे आसन सोपे व खूप लाभदायी

यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की,अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी भाजपा सरकारने देशभरात 15 कलमी कार्यक्रम लागू केला. सध्या या योजनेचा लाभ देशातील लाखो अल्पसंख्याक घेत आहेत. या १५ कलमी कार्यक्रमांतर्गत बेरोजगारांना व्यवसायाची संधी मिळावी, यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक अार्थिक विकास महामंडळाद्वारे थेट कर्ज योजना सुरू करण्यात आली याचा शहर व तालुक्यातील अल्पसंख्याक समाजातील तरूणांनी लाभ घ्यावा.

Solapur
Onion Paratha Recipe : वाढत्या उन्हापासून वाचायचं आहे? ट्राय करा आजीच्या बटव्यातला हा पदार्थ!

यावेळी बोलताना महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सी.ए.बिराजदार म्हणाले की,महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्याक बहुल महिला बचतगटांनाही व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.