सोलापूर-मिरज एक्‍सप्रेस सुरु करण्यास मिळेना मुहूर्त

रेल्वे प्रशासनाची उदासिनता; प्रवाशांचे मात्र हाल
 Railway
Railwayesakal
Updated on

सोलापूर : सोलापूर-कोल्हापूर मार्गावरील सोलापूर-मिरज एक्‍सप्रेस (Solapur-Miraj Express) मार्च 2020 पासून कोरोनामुळे (Corona) बंद करण्यात आली. ही गाडी कुर्डूवाडी स्थानकाहून मार्गस्थ होते. त्यामुळे सोलापूर-मिरज एक्‍सप्रेस बंद असल्याने शिक्षण घेण्यासाठी कुर्डूवाडीहून मिरजकडे जाणा-या अभियांत्रीकी, वैद्यकीय आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मिरज एक्‍सप्रेस सुरु करण्यास रेल्वे प्रशासनास केंव्हा मुहूर्त मिळणार असा प्रश्‍न सर्वसामान्य प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

मार्च 20202 पासून कोरोनामुळे रेल्वेची प्रवासी सेवा ठप्प झाली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर हळूहळू सर्व व्यवहार आणि 80 टक्‍के गाडया पूर्ववत सुरु झाल्या. मात्र सोलापूर-कोल्हापूर, आणि सोलापूर-मिरज त्याचबरोबर सोलापूर-पुणे सकाळी धावणारी डेमू पॅसेंजर, आणि पुणे-सोलापूर डेमू पॅसेंजर, सोलापूर-मनमाड-नागपूर व्दिसाप्ताहिक या गाडया अद्यापही बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनांकडून गाडया केंव्हा सुरु करणार याची आणखीन काही दिवस तरी प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 Railway
106 दिवस उलटूनही बेकायदा रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यास टाळाटाळ

सध्या सुरु असलेल्या गाडयांमध्ये एसटी बंदमुळे आरक्षण मिळत नाही. या रेल्वेचे साधारण तिकीट अद्यापही सुरु केलेले नाही. त्यामुळे कोल्हापूर, मिरजकडे जाण्यासाठी पर्यायी रेल्वे उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता सोलापूर-मिरज एक्‍सप्रेस सुरु केल्यास सोलापूर, मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगर, जतरोड, कवठेमहंकाळ, ढालगांव, सलगरे, अरग येथील प्रवाशांची सोय होणार आहे. रेल्वेच्या आरक्षणाचे दर वाढविल्याने प्रवाशांच्या खिशावर अधिक भार पडला आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. कोरोनापूर्वीप्रमाणे तिकीट दर ठेवून जनरल तिकीट सुरु करण्याची मागणी प्रवाशी आणि प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. मागील एक महिन्यांपासून एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे एसटीची चाके अद्यापही पूर्ण क्षमतेने धावत नसल्याने प्रवाशांना टॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे. मात्र टॅव्हल्सचे तिकीट दर अधिक असल्याने सोलापूर-मिरज एक्‍सप्रेस सुरु करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

 Railway
मोहोळ : कारची दुचाकीला धडक; पत्नीसमोरच जखमी पतीने सोडले प्राण

या एक्‍सप्रेस गाडया आहेत सुरु

सोलापूर-हुतात्मा, सोलापूर-सिध्देश्‍वर, मुंबई-चेन्नई, मुंबई-गदग, मुंबई-हैदराबाद, मुंबई-बंगळुरु उद्यान एक्‍सप्रेस, कोणार्क एक्‍सप्रेस, हुसेनसागर एक्‍सप्रेस, कराईकल एक्‍सप्रेस, सोलापूर-पुणे डेमू पॅसेंजर.

सोलापूर - मिरज या एक्‍सप्रेस गाडीस या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबा असल्याने अनारक्षित तिकीट काढून प्रवास करणारे प्रवासी यांचा चांगला प्रतिसाद या रेल्वे गाडीस मिळत होता. ही बाब विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने सोलापूर - मिरज एक्‍सप्रेस पूर्ववत सुरु करावी.

- संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर .

मार्च 2020 पासून कोरोनामुळे गाडी बंद करण्यात आली आहे. याबाबत गाडी सुरु करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत त्यामुळे गाडी केंव्हा सुरु होईल याबाबत माहिती नाही.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.