Solapur : प्रशासनाच्या चुकीच्या पावसाची आकड़ेवारी कळविण्यामुळे दुष्काळी यादीतुन मोहोळ तालुका वगळला - आमदार माने

जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून लोकनेते कारखान्याची ख्याती आहे.
solapur
solapursakal
Updated on

सोलापुर - जिल्ह्यातील पर्जन्यमापक नादुरुस्त आहेत, त्यामुळे प्रशासनाने वरिष्ठांना पावसाची चुकीची आकडेवारी कळविली आहे, त्यामुळेच दुष्काळाच्या यादीतून मोहोळ तालुका वगळला गेला आहे. जिल्ह्यात परिणामी मोहोळ तालुक्यात पाऊस अत्यंत कमी झाला आहे,

त्यामुळे दुष्काळ आहे, तालुक्याचा समावेश दुष्काळी यादीत करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे प्रतिपादन मोहोळ चे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी केले.

अनगर ता मोहोळ येथील लोकनेते अग्रो इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या 20 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्यात आमदार माने बोलत होते.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले, दुष्काळाच्या यादीतून मोहोळ तालुका वगळून मोठा अन्याय केला आहे. संपूर्ण पावसाळा कोरडा गेला, परंतु पाऊस झाला नाही.

त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून लोकनेते कारखान्याची ख्याती आहे. दुष्काळी परिस्थिती मुळे पुढच्या वर्षी कारखाने सुरू होतील की नाही या बाबत शंका आहे. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून येत्या सोमवार ता 23 पासून सन 2022/23 या गाळप हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाला प्रति टन 75 रुपये प्रमाणे हप्ता देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

solapur
Solapur : नवरात्रोत्सवात दररोज पाचशे कन्यांचे पूजन

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, माझे आजोबा ऊस उत्पादक शेतकरी होते, त्यामुळे ऊस उत्पादकांच्या काय अडचणी असतात याची मला माहिती आहे. मोहोळ तालुक्यात बिकट परिस्थिती आहे. मी स्वतः व जिल्हा कृषी अधीक्षक यावर विचार करून तालुका दुष्काळी यादीत समाविष्ट व्हावा यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठाकडे पाठवून देणार आहे.

solapur
Solapur : सांगोला नाका परिसर सुधारणा कामास प्रारंभ; मंगळवेढा शहरालगतच्या कान्होपात्रानगर ग्रामपंचायतीची अधिसूचना

यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राजन पाटील,आमदार यशवंत माने, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकाश चवरे, रामदास चवरे, प्रकाश कस्तुरे, हनुमंत पोटरे, सज्जन पाटील, दीपक माळी, सतीश भोसले, जगन्नाथ कोल्हाळ, माऊली चव्हाण, हिम्मत पाटील, काका भोसले, नाना डोंगरे, मदन पाटील, काका पवार, हेमंत गरड, कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, तहसीलदार सचिन मुळीक, मुख्याधिकारी योगेश डोके, गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, यांच्या सह ऊस उत्पादक सभासद सर्व संचालक, खाते प्रमुख, उपस्थित होते. सूत्रसंचालन सत्यवान दाढे यांनी केले आभार काका पवार यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.