Solapur : अग्निशमन क्षेत्रात मुगळीच्या तरुणाचा झेंडा

गजानंद बिराजदार यांनी मिळवली दोन पेटंटसह डॉक्टरेट
दोन पेटंटसह डॉक्टरेट
दोन पेटंटसह डॉक्टरेटsakal
Updated on

अक्कलकोट : मुगळी सारख्या महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील छोट्याशा खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या गजानंद शरणप्पा बिराजदार या तरुणाने अग्निशमन सारख्या संवेदनशील विषयात आमूलाग्र बदल सुचवीत पाच शोधनिबंध सादर केले असून दोन पेटंटसह डॉक्टरेट मिळविली आहे.

आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांनी मिळवलेले यश निश्चितच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पथदर्शक आहे. त्यांची वाटचाल इतरांना प्रेरणादायी आहे. गजानंद यांचे हे कार्य येत्या काळात अग्निशमन क्षेत्रात खूप मोठे बदल घडवून होणारे नुकसान अगदी कमी कसे होईल यासाठी दिशा देणारे ठरणार आहे. गजानंद यांनी आई वडिलांची प्रेरणा व जिद्दीच्या जोरावर माध्यमिक शिक्षण सांगोगी (ब) येथील गुरुकुल आश्रम तर महाविद्यालय शिक्षण दयानंद महाविद्यालय येथे पूर्ण केले.

पुढे प्रत्येक वेळी शिष्यवृत्ती मिळवीत बी.ई., एम. टेक. हे शिक्षण उच्च गुणवत्तेसह प्राप्त केले. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात काम करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यांनी आपले काम अग्निशमन यंत्रणेत आमूलाग्र बदल कसे करावे आणि एखादी सोसायटी अथवा उद्योग येथे दुर्दैवाने आग लागल्यास ते विझविण्यास योग्य मार्ग सापडावा तसेच हालचाल त्वरित करून संभाव्य नुकसान कमीत कमी कसे करावे यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यावर संशोधन सुरु करून त्यासाठी पाच वेगवेगळे शोध निबंध सादर केले आहेत. ज्यातून एलपीयुचा भारतामध्ये एन.आय.आर.एफ रँकिंग ४७ आहे.

तसेच दि इम्पॅक्ट रँकिंग २०२२ नुसार ग्लोबल लेवलला टॉप शंभर युनिव्हर्सिटीमधून ७४ रँकिंग असलेले पंजाब येथील एल.पी.यु या विद्यापीठात आपले फायर सेफ्टी अँड बिल्डिंग इव्हाक्युवेशन सिस्टिम हा शोध प्रकल्प सादर केला आणि त्यावर डॉक्टरेट देखील मान्य झाली आहे. यासाठी त्यांना डॉ राजेश सिंग तसेंच डॉ अनिता गेहलोत यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनादरम्यान मागील चार वर्षात नामांकित अशा एस सी आय व स्कोपस इंडेक्सिंग प्रमाणित जर्नल्स मध्ये पाच शोधनिबंध प्रकाशित केलेला आहे. संशोधन व शिक्षणात देविदास महाराज (गुरुकुल आश्रम संगोगी), प्रा. एम. एम हिरेमठ, डॉ. अविनाश देसाई, श्री. सुनील देवकुळे, प्रा.राजकुमार बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभल्याचे गजानंद यांनी स्पष्ट केले.

गजानंद यांच्या संशोधनाचे पाच प्रमुख मुद्दे

आग जर जाण्यायेण्याचा रस्त्यातच लागली असेल तर त्याची त्वरित माहिती मिळून त्यावर पर्याय शोधणे

एखाद्या ठिकाणी आग लागल्यास आत नेमक्या कुठल्या भागात आग लागली आहे हे कंट्रोल पॅनलने माहिती मिळविणे

अग्निशामक विभागास यासंबंधी तातडीने मेसेज जाणे

रेस्क्यू पथकास आगीचा नेमका अंदाज येणारी यंत्रणा विकसित

कमीत कमी जीवित व वित्त हानी व्हावी यावर उपाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.