Solapur : संपूर्ण सोलापूर शहराला आता चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन

झोन कार्यालयांबाहेर लागणार वेळापत्रक, जल वितरणाचे नवे धोरण
solapur municipal corporation
solapur municipal corporationsakal
Updated on

सोलापूर : सत्ता असताना पाणी पुरवठा सुरळीत करता आला नाही, पण प्रशासकांच्या काळात सत्ताधारी व विरोधकांचा आवाज वाढला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपांशिवाय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आता संपूर्ण शहराला चार दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. पहाटे चार ते दुपारी एक, या वेळेत तीन टप्प्यात वेगवेगळ्या भागाला पाणी पुरवठा केला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समाविष्ट झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जल्लोष करीत आता शहराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलेल, अशा वल्गना केल्या. परंतु, ठरावीक परिसरातच ‘स्मार्ट सिटी’ दिसली. ५४ वर्षांपूर्वीची जुनाट पाइपलाइनसुद्धा त्यानंतरच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी बदलली नाही. कधी वीजेचा लपंडाव तर कधी पाइपलाइनला गळती, यामुळे शहराचा नेहमीच पाणीपुरवठा विस्कळित झाला.

त्यात पुन्हा अवेळी पाणी येत असल्याने नागरिकांची झोप उडाली होती. अशावेळी बहुतेक पदाधिकाऱ्यांच्या घरी नियमित व मुबलक पाणी सुरु असायचे. महापालिकेवर आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची सत्ता राहिली. परंतु, साधारणतः: मागील २२ वर्षांपासून सोलापूर शहराला नियमित तथा एक-दोन दिवसाआड पाणी मिळू शकलेले नाही.

आता महापालिकेवर प्रशासक येऊन एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला, आता निवडणूक कधीपण लागू शकते याचा अंदाज घेऊन अनेक लोकप्रतिनिधी पाणी प्रश्नावर निवेदने देत असल्याची वस्तुस्थिती आहे. नागरिकांनी ज्या सत्ताधाऱ्यांकडे निवेदने देऊन नियमित पाण्याची मागणी केली, तेच सत्ताधारी आता सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेत येत आहेत, हेही विशेषच.

solapur municipal corporation
Solapur : संपूर्ण शहराला आता ४ दिवसाआड पाणी; पहाटे ४ ते दुपारी एक वाजेपर्यंत टप्पे; ‘झोन’ बाहेर लागणार वेळापत्रक

सन १९६९ मधील पाइपलाइनसुद्धा नाही बदलली

टाकळी-सोरेगाव व तेथून पुढे सोलापूर शहरात येणारी पाण्याची पाइपलाइन तब्बल ५४ वर्षांपूर्वीची म्हणजेच सन १९६९ मध्ये टाकलेली आहे. आता सोलापूर शहराची लोकसंख्या दुप्पट-तिप्पट झाली, तरीसुद्धा त्याच पाईपलाईनमधून पाणी आणले जात आहे. तेव्हापासून महापालिकेने विकासकामांवर हजारो कोटींचा खर्च केला,

पण भविष्याचा वेध घेऊन ती जुनाट पाइपलाइन बदलण्याचे धाडस कोणीच दाखवले नाही. त्यामुळे ‘अंगापेक्षा भोंगाच जास्त’ अशी अवस्था त्याठिकाणी पाहायला मिळते. सतत गळती व पाइपलाइन फुटत असल्याने लाखो रुपयांचा चुराडा त्याच्या दुरुस्तीसाठी करावा लागला आहे.

सण-उत्सवांत बदलले नियोजन

सध्या सण-उत्सवाचा काळ असून कडक उन्हाळा देखील जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींच्या भेटीनंतर पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहराला चार दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले. बाळे, केगाव, देगाव, नवीपेठ, रामवाडी, सलगर वस्ती, बुधवार पेठ, रेल्वे लाईन,

solapur municipal corporation
Solapur : सोलापूरकरांना छळणाऱ्या अनुत्तरीत प्रश्‍नांवर चर्चेचे गुऱ्हाळ!

भवानी पेठ या संपूर्ण गावठाण भागाला तीन दिवसाआड आणि जुळे सोलापूरसह हद्दवाढ भागाला चार-पाच दिवसाआड पाणी दिले जात होते. ते बंद करून आता सर्वच भागाला टप्प्याटप्याने चार दिवसाआड प्रत्येकी तीन तास पाणी दिले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.