महापालिकेच्या सभेत शेरोशायरी, चिंतन अन्‌ खडाजंगी!

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation
Updated on
Summary

अनेक सदस्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मुद्दे मांडत महापालिकेची उत्पन्नवाढ कशी होईल याविषयी सूचना मांडल्या तसेच प्रशासनाच्या चुकांवरदेखील बोट ठेवले.

सोलापूर: महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत मंगळवारी चर्चेदरम्यान सदस्यांनी शेरोशायरी, चिंतन तसेच खडाजंगीचे दर्शन घडवले. अनेक सदस्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मुद्दे मांडत महापालिकेची उत्पन्नवाढ कशी होईल याविषयी सूचना मांडल्या तसेच प्रशासनाच्या चुकांवरदेखील बोट ठेवले.

Solapur Municipal Corporation
महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर एमआयएमची मोर्चेबांधणी सुरू 

सन 2021-22 अंदाजपत्रकासाठी महापालिकेची सभा महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली 25 टक्के ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावेळी सर्वप्रथम सभागृहनेता शिवानंद पाटील यांनी अंदाजपत्रकाबाबत सूचना मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अमोल शिंदे तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ सदस्य यू. एन. बेरिया यांनी स्वतंत्रपणे उपसूचना सादर केली. यानंतर अंदाजपत्रकावर चर्चेला सुरवात झाली. सत्ताधारी सदस्य श्रीनिवास करली यांच्या सूचनेचे समर्थन करीत मांडलेले अंदाजपत्रक वास्तववादी असल्याचे सांगत हद्दवाढच्या समस्या मांडल्या. या भागाकडे लक्ष केंद्रीत केल्यास मोठे उत्पन्न महापालिकेला मिळू शकते, असे मत त्यांनी मांडले. भाजपचे ज्येष्ठ सदस्य प्रभाकर जामगुंडे यांनी हे अंदाजपत्रक फुगीर नसल्याचे सांगितले.

Solapur Municipal Corporation
सोलापूर महापालिका हद्दीत 27 नवे कोरोना बाधित, एकाचा मृत्यू 

...तर परिवहनप्रमाणे महापालिकेची स्थिती

शिवसेनेचे सदस्य राजकुमार हंचाटे यांनी कर, भूमी मालमत्ता, बांधकाम विभाग हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असल्याचे सांगत प्रशासनाने सक्षमपणे काम केल्यास उत्पन्नात आणखी वाढ होऊ शकते असे सांगतानाच प्रशासनाने जर कामात सुधारणा केली नाही तर परिवहन उपक्रमामुळे महापालिकेची अवस्था बिकट होईल, असे परखड मत मांडले. मक्तेदारासोबत करारपत्र मक्तेदाराला पोषक पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आणत त्यांनी याचा महापालिकेला कसा फटका बसला याविषयी विवेचन केले.

Solapur Municipal Corporation
सोलापूर महापालिका हद्दीत 523 चाचण्यांमध्ये सापडले 54 नवे कोरोना बाधित 

हद्दवाढमधील समस्यांचे निराकरण होत नाही याकडे लक्ष वेधत त्यांनी स्मार्ट सिटीच्या एबीडी एरियाचा निधी हद्दवाढकडे वर्ग करण्याची मागणी केली. एमआयएमचे सदस्य तौफिक शेख यांनी देखील हद्दवाढ समस्यांकडे लक्ष वेधत गाळे आदींचे उत्पन्नवाढ करुन त्याचा विकासासाठी विनियोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्येष्ठ सदस्य यू. एन. बेरिया यांनी शहरातील महापालिका रेकार्डवर न आलेल्या मिळकतींचा शोध घेतल्यास उत्पन्नवाढ होऊ शकते असे मत मांडले. महापालिकेचे हित लक्षात घेऊन मक्तेदाराशी करारपत्र करण्याची गरज असताना तसे होत नाही, तेव्हा विधान सल्लागार विभाग काय कामाचा? असा सवाल त्यांनी केला.

Solapur Municipal Corporation
सोलापूर महापालिका देणार शहरवासियांना मास्क

खरादी यांच्या शेरोशायरीने रंगत

एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी नेहमीच्या शैलीत शेरोशायरी केली. "वो बुलाती है मगर जाने का नही, ये बजेट है किधर जानेका नही, निधी भी हेड पर रखनी है तो रखे मगर हेड का बजेट खाने का नही, निधी ही निधी है इस बजेट में, अभी माहोल खर्च कर जाने का नही, है बजेट छोडना मंजूर मगर महापालिकाको छोडकर जाने का नही, बो बजेट काटता है काट ले मगर आयुक्त से डर जाने का नही', या मिश्‍किल शेरोशायरीने सभेत हास्याची लकेर उमटली.

गटनेते आनंद चंदनशिवे यांनी आपल्या भाषणात निधीसंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांना लक्ष्य केले. यावरुन देशमुख समर्थक सदस्य विनायक विटकर यांनी त्यास हरकत घेतली. यावरुन दोहोंमध्ये खडाजंगी झाली. महिला सदस्य अनुराधा काटकर, श्रीदेवी फुलारे, संगीता जाधव, कुमूदिनी अंकारम, पूनम बनसोडे यांनीदेखील नागरी समस्यांकडे लक्ष वेधत महापालिकेकडून चांगल्या कारभाराची अपेक्षा व्यक्त केली.

Solapur Municipal Corporation
सोलापूर महापालिका घेणार लिपिकांची परीक्षा, दुसऱ्या संधीतही नापास झाल्यास पदावनत, प्रारंभिक वेतन श्रेणी 

.. अन्‌ मदतीला धावले सदस्य अन्‌ आरोग्याधिकारीही

सभेदरम्यान सदस्य रवी गायकवाड हे सभागृहाबाहेर जात असताना मॅटमध्ये पाय अडकल्याने खाली पडले. यानंतर त्यांना चक्कर येताच प्रसंगावधान राखून सदस्यांनी त्यांना सावरले. आरोग्याधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यादेखील तातडीने धावून आल्या. याच सभेत पायाला मार लागल्याने आजारी असलेले गटनेते किसन जाधव यांनीदेखील सहभाग नोंदवित अनेकांचे लक्ष वेधले. लुंगी व शर्ट घालून आलेल्या जाधव यांनी महापौरांच्या डायससमोरील मोकळ्या जागेत खुर्चीवर बसून चर्चेत भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.