Solapur : नगरपालिका, पंचायत समितींच्या मुदती संपल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष; नागरिक आक्रमक

त्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळणार का ? किंवा त्यांच्या मनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासकांनी देणे अपेक्षित आहे
Solapur
Solapursakal
Updated on

Solapur - मंगळवेढा स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपालिका आणि पंचायत समितीवर गेले दीड वर्षापासून प्रशासक असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीचा अपेक्षित निपटारा होत नसल्यामुळे प्रशासकाच्या या कारभाराबद्दल नागरिकातून नाराजीचा सूर उमटत आहे.

Solapur
Mumbai Crime: हत्या केली आणि स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन मारहाण केल्याचा रचला बनाव; डोंबिवलीतील घटना

शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी या नगरपालिका व पंचायत समितीची निगडित असतात मात्र नगराध्यक्ष व नगरसेवकाची मुदत संपल्यामुळे नगरपालिकेवर व पंचायत समितीवर सभापती व सदस्य पदाची मुदत संपल्यामुळे प्रशासक आहे मात्र याच शासकीय कार्यालयाशी नागरिकांचे प्रश्न या कार्यालयाशी निगडित असतात मात्र या कार्यालयाची जबाबदारी सध्या प्रशासकाच्या हातात आहे.

Solapur
Solapur : बीडीओ साहेब मागे हटायचं नाय... मी आणि खासदार तुमच्या पाठीशी; आ. समाधान आवताडे

परंतु हे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात कमी पडत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीत भर पडत आहे. या तक्रारीकडे प्रशासकाने सोयीस्कर त्या दुर्लक्ष केल्यामुळे समविचारी आघाडीच्या वतीने प्रांत कार्यालयावर काढलेल्या मोर्चामध्ये शहर विकास आराखड्यामध्ये जवळपास 500 घरे बेघर होण्याचा आरोप पक्षनेते अजित जगताप यांनी केला मात्र या शहर विकास आराखड्यासंदर्भात नेमकी किती लोक बेघर होणार ?

त्यांना भूसंपादनाचा मोबदला मिळणार का ? किंवा त्यांच्या मनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासकांनी देणे अपेक्षित आहे याशिवाय नगरपालिकेमध्ये गटार साफ करणे, शौचालय परिसरातील स्वच्छता व आरोग्याशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहेत तसेच जिल्हा नियोजन मंडळ नगरोत्थान व दलित वस्ती विकास योजनेच्या निधीसाठीचा प्रस्ताव सादर करताना लोकप्रतिनिधी नसताना देखील प्रशासनाने तितक्याच ताकतीने काम करून शासनाचा निधी शहराला कशा पद्धतीने मिळवता येईल.

Solapur
Crime News: फेसबुक मैत्री पडली महागात! लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

या दृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित होते मात्र त्यांच्याकडून फक्त दिवसाचे कामकाज करण्यावर भर असल्यामुळे जिल्हा नियोजन मधला निधी शहरातील स्वच्छता ,शहर विकास आराखड्यामध्ये नागरिकांमधील असणारा संभ्रम दूर करण्यास नगरपालिका प्रशासन कमी पडलेले आहे.

अगदी तीच परिस्थिती पंचायत समितीच्या कारभारामध्ये आहे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तालुक्यामध्ये करमाळ्याप्रमाणे 400 ते 500 विहिरीला मंजुरी देणे अपेक्षित होते मात्र गटविकास अधिकारीची ही भूमिका ढिम राहिली,

Solapur
Mumbai Crime : दादरमधील 'त्या' अपघात प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

तर ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांनीच या कामावर संप केल्यामुळे या कोट्यावधीच्या निधीपासून तालुक्यातील शेतकरी वंचित राहिले, पावसाळ्याच्या तोंडावर विहिरीच्या कामाला गती घेण्याचे नाव गटविकास अधिकारी घेत नाहीत.

अनेक विहिरीची हजेरीपत्रक झिरो केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे याशिवाय विहीर व घरकुलावर हजेरी पत्रकावर ग्रामसेवकांची सही करण्यास अनेक ग्रामसेवकांनी आकडता हात घेतलाय या प्रकाराकडे दस्तुरखुर्द मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कानावर हा प्रकार घालून देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे,

Solapur
Pune Crime: पुण्यातील सिंहगड रोडवर डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या

जल जीवन कामे,ग्रामसभा,उन्हाळ्यातील पाणी टंचाईकडे ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्याबद्दलच्या तक्रारीकडे पंचायत समिती लक्ष देत नाही. त्यामुळे नगरपालिका व पंचायत समितीच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये अधिक नाराजी उमटत आहे.

नगरपालिकेच्या कारभाराबद्दल आ. समाधान आवताडे यांनी बैठक घेऊन गंभीर इशारा दिला. त्यानंतर काही कामाला गती घेतली.पण काही प्रश्नाकडे दुर्लक्ष केले पुन्हा एकदा आ.अवताडे यांनी तात्काळ पंचायत समिती व नगरपालिकेच्या कारभाराबद्दल स्वतंत्र आढावा बैठक घेऊन त्यामध्ये नागरिकांच्या तक्रारीचा समक्ष निपटारा करावा अशी मागणी सध्या होऊ लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.