सोलापूरची राष्ट्रवादी पुन्हा पडली तोंडघशी 

ncp logo
ncp logo
Updated on

सोलापूर : नेता नसल्यावर सरदारांची काय स्थिती होते? याचा प्रत्यय सध्या सोलापूरची राष्ट्रवादी कॉंग्रेस घेत आहे. मोहिते-पाटील यांच्या सदस्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे पराभूत झालेल्या राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. झेडपीच्या सभागृहात पराभूत झालेली सोलापूरची राष्ट्रवादी कॉंग्रेस आता न्यायालयीन लढाईतही पराभूत होण्याची शक्‍यता आहे. अपात्रतेच्या कारवाईला न्यायालयातून स्थगिती मिळाल्याने राष्ट्रवादी पुन्हा एकदा तोंडघशी पडली आहे. 
हेही वाचा - मोहिते-पाटील गटाच्या वकिलांनी असा केला युक्तिवाद की, उच्च न्यायालयाकडून स्थगिती 
माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे सदस्य अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत बंडखोरी करणार हे जवळपास सहा महिने अगोदरपासून निश्‍चित होते. राष्ट्रवादीने तरी देखील आवश्‍यक त्या उपाययोजना न केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत नेते आहेत परंतु सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि वेळप्रसंगी साम, दाम, दंड सर्व शक्ती वापरणारे नेतृत्व नसल्याने राष्ट्रवादीची ही स्थिती झाल्याचे मानले जात आहे. बंडखोरी रोखण्यासाठी अध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीचा त्यातही राष्ट्रवादीचा रीतसर व्हीप बजावणे आवश्‍यक असताना व्हीपसाठी खर्च करायचा कोणी? येथून राष्ट्रवादीची सुरवात झाली. व्हीप प्रकरणात राष्ट्रवादीला अपयश आल्यानंतर बंडखोर सदस्यांच्या अपात्रतेसाठी वकिलांची नियुक्ती असो की पाठपुरावा यामध्ये देखील राष्ट्रवादी कमी पडल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. 
हेही वाचा - नैसर्गिक रंगात रंगला श्रीरंग 
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड असो की अपात्रतेच्या कारवाईतून सही सलामत बाहेर निघण्यासाठी मोहिते-पाटलांनी आखलेली प्रत्येक खेळी जवळपास यशस्वी होताना दिसत आहे. मोहिते-पाटील यांच्या राजकीय अनुभवाचा आणि मुरब्बीपणाचा प्रत्यय सध्या सोलापूरची राष्ट्रवादी घेऊ लागली आहे. वकिलांच्या नियुक्तीपासून ते कायदेशीर लढाईपर्यंत मोहिते-पाटील यांनीच बाजी मारली आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणी करायचे? हा प्रश्‍न जोपर्यंत मार्गी लागत नाही तो पर्यंत राष्ट्रवादीला असेच धक्के सहन करावे लागणार हे निश्‍चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.