Solapur : संशोधनातून गूळमिश्रित चहापत्तीचे उत्पादन

मंत्री चंडक नगरातील पल्लवी वाले यांची कामगिरी; साखरेला नैसर्गिक गुळाचा पर्याय
agro startup
agro startupsakal
Updated on

सोलापूर : साखरेला रोजच्या आयुष्यात आरोग्यदायी गुळाचा पर्याय देण्याच्या अनेक महिने केलेल्या संशोधनातून जुळे सोलापुरातील पल्लवी वाले यांनी सुरू केलेल्या वालेज गूळमिश्रित चहापत्ती उत्पादनाने वेगळी ओळख बनवली आहे.

विजयपूर रोडवरील मंत्री चंडक नगर येथील रहिवासी असलेल्या पल्लवी वाले या गृहिणी असल्या तरी त्यांचे पती धनराज वाले हे मार्केटिंग कंपनीत कार्यरत असल्याने व्यावसायिकतेची मूल्ये त्यांना शिकण्यास मिळाली. नंतर त्यांनी काही व्यावसायिक व उद्योजक म्हणून काम करणाऱ्या महिलांच्या बिझनेस वूमन्स ग्रुपकडून व्यवसाय, मार्केटिंग आदी कौशल्ये आत्मसात केली. त्यासोबत त्यांनी उत्पादन निर्मितीचे प्रयोग सुरू केले. लोकांच्या दररोजच्या आयुष्यात आरोग्यदायी उत्पादने देण्यासाठी त्यांनी प्रयोग सुरू केले. त्यांचे पती धनराज वाले यांनी त्यांना मदत केली. सुरवातीला त्यांनी गवती चहावर संशोधन केले. गवती चहाच्या मदतीने त्यांनी चहाचे १२ ते १३ प्रकार विकसित केले. पण ते फारसे उपयोगी ठरत नसल्याचे स्पष्ट झाले.

मग आरोग्यासाठी प्रत्येक कुटुंबात खाद्यतेल बदलले जाते. त्यावर संशोधन केल्यानंतर त्यांनी आरोग्यदायी नैसर्गिक खाद्यतेल निर्मितीचे काम करण्याचे ठरवले. पण अचानक खाद्यतेल बाजारपेठेत झालेला बदल हा लहान उद्योजकासाठी हानिकारक ठरेल, असे लक्षात आले. मग त्यांनी घरातील साखरेला गुळाच्या चहाचा पर्याय देण्यासाठी काम सुरू केले.

गुळासोबत मिसळणाऱ्या तयार चहापत्तीचे उत्पादन त्यांनी सुरू केले. त्यामध्ये काही फ्लेव्हर त्यांनी तयार केले. साखरेतील हानिकारक सल्फरसारखे घटक टाळण्यासाठी गुळाचा वापर करण्याचा ट्रेंड वाढल्याने त्यांचे हे उत्पादन त्यासाठी उपयुक्त ठरले. त्यांनी या उत्पादनामुळे दूध नासणार नाही, साइड इफेक्टचा अभ्यास करून उत्पादन वालेज नॅचरल नावाने गूळमिश्रित चहापत्तीचे उत्पादन बाजारात आणले. सुरवातीला स्वतःचे चहाचे हॉटेल सुरू करून गुळाचा चहा विक्री सुरू केली. ग्राहकांचा प्रतिसाद समजून आवश्यक ते बदल केले. त्यानंतर आता उत्पादनाची विक्री सुरू झाली.

याच दिवाळीत त्यांनी स्वतःचे रिटेल सेंटर सुरू केले. त्यासोबत शहरात फ्रॅंचायझी देखील देण्यास सुरवात केली. एका घरात साखरेच्या चहाला पूर्ण पर्याय देण्यासाठी हे उत्पादन उपयोगी ठरते. रसायनमिश्रित साखरेला पूर्ण नैसर्गिक पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिला आहे.

ठळक बाबी

- व्यावसायिक कौशल्यांचा अभ्यास

- रसायनमिश्रित साखरेला गुळाचा पर्याय

- एकाच खरेदीत गूळमिश्रित चहापत्ती उपलब्ध

- स्वतः चहा कॅंटीन चालवून ग्राहकांचा कमावला विश्वास

- उत्पादनाला सुयोग्य मार्केटिंग कौशल्याची जोड

अनेक प्रयत्नांनंतर आरोग्यदायी व लोकांच्या रोजच्या वापरात येणारे नैसर्गिक गूळमिश्रित चहापत्तीचे उत्पादन सुरू केले. हे उत्पादन बाजारात आणण्यासाठी केलेले प्रयत्न देखील पती धनराज वाले यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी झाले.

- पल्लवी वाले, उद्योजिका, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.