Solapur News : धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावनणी न केल्यास शासनकर्त्यांना धनगर समाज त्यांची जागा दाखवेल

मोहोळ येथे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी मोहोळ तालुका समस्त धनगर समाजाच्या वतीने "जन आक्रोश" मोर्चा काढण्यात आला
solapur
solapursakal
Updated on

मोहोळ - मागील 50 वर्षांपासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी लढा देत आहे, तो लढा देत असताना वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढले मात्र या लढ्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सरकार बरोबर सनदशीर पद्धतीने चर्चा करूनच मार्ग काढावा लागेल, असे सांगत जर सरकारने धनगर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही केली तर लोकशाहीने दिलेल्या सर्वात मोठा अधिकार मतदानाच्या माध्यमातून धनगर समाज नक्कीच येत्या निवडणुकीत शासनकर्त्याना त्यांची जागा दाखवेल,असे प्रतिपादन माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केले.

मोहोळ येथे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी मोहोळ तालुका समस्त धनगर समाजाच्या वतीने "जन आक्रोश" मोर्चा काढण्यात आला त्यावेळी माजी आमदार रुपनवर बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मेंढरा समवेत व गजे ढोलांच्या निनादात घोषणा देत मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्या नंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

माजी आमदार रूपनवर पुढे म्हणाले समाजातील युवकांनी एकमेकांच ऐकून घेतलं पाहिजे, समन्वय ठेवला पाहीजे पण तसे होताना दिसत नाही.हाच आपल्या समाजात सर्वात मोठा दुर्गुण आहे. यापुर्वी शरद पवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणा बाबत मी व स्व.गणपतराव देशमुख यांच्यासह समाजातील अन्य नेते उपस्थित असताना त्यांनी धनगरांना आरक्षणाची गरज कशी आहे हे अधिकाऱ्यांना कोण पटवून देईल,

solapur
Solapur : दोन बंदूक, पाच गोळ्यांसह तरुणाला पोलिसांकडून अटक

हे तुमच्या पैकी एकाने ठरवा. त्यामुळे समाजातील जेष्ठ व युवकांना माझे आव्हान आहे की, आपल्याला आरक्षण मिळवायचे असेल तर तिन्ही आघाड्यावर म्हणजेच रस्त्यावरची लढाई, सभागृहातील लढाई आणि न्यायालयीन लढाई या ताकतीने लढाव्या लागतील तरच धनगर समाजाला आरक्षण मिळेल.

solapur
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

यावेळी चेतन नरुटे कल्याणी वाघमोडे, शेखर बंगाळे, प्रा.शिवाजी बंडगर, आण्णासाहेब रुपनवर, बिरुदेव देवकते, कृष्णदेव वाघमोडे, बाळासाहेब वाघमोडे, रामचंद्र खांडेकर, शिवाजी पुजारी, धनाजी गावडे, यशवंत नरूटे, नागनाथ क्षिरसागर, माऊली हळणवर, तात्या पाटील, समाधान पाटील, बाळासाहेब राजेपांढरे, विलास ढेरे, फंटु गोफणे, अनंता नागणकेरी, मंगेश पांढरे, लक्ष्मण करे, सुभाष मस्के, नामदेव नरुटे, शाहीर सलगर, संजय क्षिरसागर, नितीन टेळे, निलेश जरग, सुशील क्षिरसागर, ओकांर देशमुख, सोनबा पाटील, कालिदास गावडे, अतुल गावडे, कृष्णदेव वाघमोडे, रमेश बारसकर, विनोद कांबळे, समाधान पाटील, चंद्रकांत बरकडे, मंगेश पांढरे, दत्तात्रय पांढरे, पिंटू बरकडे, मोहन गावडे, अर्जुन सलगर आदिंची प्रमूख उपस्थिती होती.

solapur
Ahmednagar : जिल्ह्याचा भार ३७ डॉक्टरांवर ; जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; ५०० बेडची मागणी दुर्लक्षित

या आंदोलनाला ज्योती क्रांती परिषद, जय महाराष्ट्र प्रतिष्ठान, सकल मराठा समाज, भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहोळ तालुका व शहर यांनी पाठींबा व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.