Solapur News : मराठा आरक्षण दडपण्यासाठी माझ्यावर सरकारचे अनेक प्रयत्न. -जरांगे पाटील.

कुर्डू येथील सभेला माढा व करमाळा तालुक्याच्या सभेला सकल मराठा बांधवांची विराट हजेरी.
solapur
solapur askal
Updated on

कुर्डू - मराठा आरक्षण दडपण्यासाठी माझ्यावर सरकारने अनेक प्रयत्न केले असून त्याला बळी न पडता गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही .असे प्रतिपादन मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी माढा व करमाळा तालुक्याच्या वतीने कुर्डू ता माढा येथील मंगल कार्यालयासमोरील प्रांगणात आयोजित सभेत केले.यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

कार्यक्रम स्थळी सकाळी १०.३०वाजता जरांगे पाटील यांचे आगमन झाले. महिलांच्या हस्ते औक्षण करुन स्वागत करण्यात आले.त्यांनी मंचकावर असणाऱ्या छत्रपती चा आशिर्वाद घेऊन मनोगताला सुरवात केली.

तत्पूर्वी शाहीर विशाल इंदलकर यांनी वस्तु स्थीती वर पोवाडा गायला व प्रदीप साळुंके मनोगत, माऊली पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की आरक्षणासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर.आरक्षाचे खापर मराठ्यांच्या माथी फुटू नये. त्यासाठी सरकार ला चाळीस दिवसाचा अवधी दिला आहे .त्याची मुदत १४आक्टोबर ला संपत आहे.त्याच निमित्ताने अंतरवली सराटी, ता अंबड, जिल्हा जालना. या मेळाव्यात मराठा आरक्षणाची अंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

solapur
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

मराठ्यांनो ही संधी गमावू नका आरक्षण प्रकिया अंतिम टप्यात असुन सरकार व समिती आरक्षणावर चोवीस काम करत आहे. यासाठी शांततेत मराठा बांधवांनी प्रशासनाला ताण पडेल अशी कृती न करता उपस्थित राहण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

मराठा बांधव व ओबीसी बांधव गावपातळीवर गुण्या गोविंदा ने राहत आहेत राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंबई त बसुन त्यांचे नेते आरक्षण विषयी गैरसमज पसरवले जात आहेत.ओबीसी च्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हीही त्यातच आहोत आमच्या आम्हाला द्या ही मागणी आहे.

solapur
Mumbai News : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट ; कोणते मंत्री येणार अडचणीत ?

या कार्यक्रमासाठी संजय टोणपे, बाबासाहेब गवळी, मच्छिंद्र कदम, अरूण जगताप, हर्षल बागल, सुरेश बागल, प्रमोद बागल, सुहास टोणपे, शरदश्चंद्र भोसले, वाहेद शेख, दत्ता काकडे, यांच्या सह सखल मराठा समाजातील सर्व घटकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

solapur
Sangli News : १९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे उपोषण 'ह्या' आहेत मागण्या

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल बागल, सुधीर क्षिरसागर यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी कुर्डुवाडी येथील मुस्लिम बांधवांनी साखळी उपोषण केले त्याबद्दल जरांगे पाटील यांच्या हस्ते मुस्लिम समाज प्रातिनिधिक स्वरूपात

वाहेद शेख, मोहसीन मुकणे व अकलाख दाळवाले यांचा सत्कार करण्यात आल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.