Solapur News : उन्हाचा चटका अन्‌ जिवाची तगमग; ऐन श्रावणात वैशाख वणव्याच्या झळा

राखी पौर्णिमा झाल्यावर जिल्ह्यात परतीचा पाऊस येतो. मात्र सगळीकडे पावसाऐवजी कडक उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे.
solapur news
solapur news sakal
Updated on

रोपळे - पंढरपूर शहर व तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे लोकांना ऐन श्रावणात वैशाख वणव्याच्या झळा अनुभवायला मिळू लागल्या आहेत. जिवाची काहिली करणाऱ्या या उन्हामुळे सगळेच हैराण झाले आहेत. उन्हाच्या चटक्याने लोकांच्या जिवाची तगमग होऊ लागली आहे.

श्रावणात नेहमीच ‘घन निळा बरसतो’ या गाण्यातील आशयाचे दृश्य दिसते. मात्र यावेळी श्रावणात चक्क कडक उन्हाचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. जून महिन्यात पावसाला सुरवात होत असते. यंदा सप्टेंबर हा ऐन पावसाचा महिना असूनही पावसाची चाहूल देखील लागत नाही.

solapur news
E-Crop Inspection: ई-पीक पाहणीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत

गेल्या महिन्यात काही भागात कुठे तरी तुरळक पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या. त्यावर खरिपातील पिके तग धरून उभी होती. सध्या ही पिकेही पाण्यावाचून माना टाकू लागल्या आहेत. त्यातच दुपारी ३३ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानात वाढ झाली होती.

solapur news
Benefits Of vitamin D: फक्त कॅल्शियमच नाही तर मजबूत हाडांसाठी हे व्हिटॅमिन्सही आहेत खूप महत्त्वाची, जाणून घ्या

माणसांसह मुक्या जनावरांची तगमग

राखी पौर्णिमा झाल्यावर जिल्ह्यात परतीचा पाऊस येतो. मात्र सगळीकडे पावसाऐवजी कडक उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांसह माणसांची तगमग वाढली आहे.

उन्हाचा त्रास सहन होत नसल्यामुळे शेतकरी दुपारच्या वेळी आपल्या शेतातील झाडाच्या सावलीचा आधार घेत आहेत. तर जनावरांना शेतात चरायला चारा नसल्यामुळे सावलीला बांधून ठेवल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.

solapur news
Aparna P Nair Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू! घरात सापडला मृतदेह

भयंकर ऊन पडतंय, त्यामुळं जिवाची तगमग होतेय. शेतातील पिके सुकली आहेत. उन्हामुळे दुपारी शेतात कामे करू वाटत नाहीत. नुसतं झाडाच्या सावलीत बसून राहावे असे वाटते.

- कुमार आदमिले, शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर

शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत पाण्यावाचून तग धरून राहिलेली पिके वाचवण्यासाठी योग्य त्या औषधांची पिकांवर फवारणी करावी.

- अजय आदाटे, कृषितज्ज्ञ, मंगळवेढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.