Solapur News : टाकळी सिंकदर येथे आढळला मानवी मृतदेह,ओळख पटविण्यात पोलीसांना यश

जवळ जाऊन पाहिले असता एका अनोळखी मानवाच्या मृतदेहाचे कुत्री लचके तोडत असल्याचे त्यांना आढळून आले.
solapur
solapursakal
Updated on

टाकळी - सिकंदर ता मोहोळ येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सकाळी आठ वाजता मानवी मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र पोलिसांनी कपडे, चप्पल व खिशातील औषधाच्या गोळ्यावरून माग काढत मृतदेहाची ओळख पटविण्यात यश प्राप्त केले. शंकर मारुती वाघमोडे वय 28 रा पुळुज ता पंढरपुर असे मृताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, टाकळी सिकंदर येथील मनोहर दिगंबर चव्हाण वय 65 हे सोमवार ता 18 रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या शेतात पिकाला पाणी सोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना भटकी कुत्री काहीतरी खात असल्याचे दिसले. मनोहर चव्हाण यांनी त्यांच्या शेजारी असलेल्या बबन यशवंत चव्हाण यांच्या शेतात जाऊन पाहिले असता मोठी दुर्गंधी सुटली होती. जवळ जाऊन पाहिले असता एका अनोळखी मानवाच्या मृतदेहाचे कुत्री लचके तोडत असल्याचे त्यांना आढळून आले.

solapur
Solapur News : रखडलेली कामे मार्गी लावा,गाव सोबत आणतो भाजप आमदाराला राष्ट्रवादीच्या नेत्याचे आव्हान

मनोहर चव्हाण यांनी या बाबत टाकळी येथील संतोष चव्हाण यांना या बाबत माहिती दिली व मोहोळ येथे येऊन पोलिसात खबर दिली.

दरम्यान खबर दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण यांनी घटनास्थळ गाठले,व पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांना मृतदेहा जवळ कपडे, चप्पल व खिशात औषधाच्या गोळ्या आढळून आल्या. दरम्यान ता 13 सप्टेंबर रोजी मोहोळ पोलिसात मिसिंग दाखल झाले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी मृत शंकर वाघमोडे याच्या आई व पत्नीला बोलावून घेतले व त्यांना तो मृतदेह दाखविला असता त्यांनी तो शंकरचाच असल्याचे ओळखले. या प्रकरणी मनोहर दिगंबर चव्हाण यांनी खबर दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण करीत आहेत.

solapur
Solapur News : खरिपाची भरपाई मिळण्यावर प्रश्नचिन्ह; जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना विमा कंपनीला अमान्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.