Solapur News : प्रजासत्ताक दिनी ‘इंद्रभुवन’ नागरिकांसाठी होणार खुले

विद्युत रोषणाईने कायमस्वरूपी उजळणार इमारत
Solapur News indrabhuvan will open for citizens on Republic Day
Solapur News indrabhuvan will open for citizens on Republic Daysakal
Updated on

सोलापूर :  शहराच्या सौंदर्यात भर टाकणारी ११० वर्षांची हेरिटेज वास्तू इंद्रभुवन इमारत प्रजासत्ताक दिनापासून नागरिकांसाठी खुली होणार आहे. गतवैभव प्राप्त झालेली इंद्रभुवन इमारत कायमस्वरूपी विद्युत रोषणाईने उजळणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली.

सोलापूर महापालिकेच्या ११० वर्षांच्या इंद्रभुवन या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी ‘स्मार्ट सिटीच्या पाच कोटी १३ लाख रुपये खर्चातून नूतनीकरण करण्यात आले आहे.

गेल्या दहा महिन्यांपासून १५० कामगारांच्या परिश्रमातून या इमारतीचे नूतनीकरणाचे काम नेटक्या पद्धतीने सुरू आहे. महत्त्वाची अंतर्गत ९५ टक्के कामे पूर्ण झाली असून बाहेरील बाजूची किरकोळ कामे आता हाती घेण्यात आली आहेत.

इतर सर्व कामे २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होतील. या इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई कायमस्वरूपी करण्यात आली आहे.

यामुळे अत्यंत मनोहारी आणि विलोभनीय असे इमारतीचे दर्शन आता प्रजासत्ताक दिनापासून सर्वांना रोजच घडणार असल्याने सोलापुरात येणाऱ्यांसाठी हे एक खास आकर्षण असणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. कारंजे यांनी सांगितले.

ऐतिहासिक वास्तूत असणार ‘ही’ कार्यालये

महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये या इंद्रभुवन इमारतीत पुन्हा स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. इंद्रभुवन इमारतीत महापालिका आयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त व चार सहायक आयुक्तांची कार्यालये राहणार आहेत.

तर तळमजल्यावर कलादालन असणार आहे. यामध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालय राहणार आहे. सोलापूरचा इतिहास सांगणारी छायाचित्रेही लावण्यात येणार आहेत. पहिल्या मजल्यावर सेंट्रल हॉल राहणार आहे तर दुसऱ्या मजल्यावर महापालिका आयुक्तांचे कार्यालय असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.