Solapur News : शहरात लम्पीबाधित गायी मोकाट

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; संसर्ग वाढण्याची भीती
lampi
lampisakal
Updated on

सोलापूर - राज्यातील दुभत्या जनावरांमध्ये फैलावत चाललेल्या लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करत आहे. तर दुसरीकडे शहरात लम्पीबाधित गायी मोकाट फिरत असल्याचे दिसत आहे. अशा गायी मोकाट फिरणे धोक्याचे असून, महापालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. मोकाट जनावरांचा त्रास सर्वांनाच होता, त्यातच लम्पीबाधित गायींचा वावर यामुळे आणखी धोका वाढला आहे.

रस्त्यावर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याने वाहनधारकांसोबत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उघड्यावर अन्न टाकण्याचे प्रकार वसाहतीमधून भाजीपाला व खानावळ, हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रीची अनेक दुकाने, हातगाड्या असतात. शहरातील व्यापारी व नागरिकांमुळे रस्त्यावर पडणाऱ्या अन्नामुळे मोकाट जनावरे, कुत्र्यांना पोटभर खाण्यास मिळते. हॉटेलमधील शिल्लक अन्नपदार्थ उघड्यावर टाकले जात तिथे मोकाट जनावरे व कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्‍न ऐरणीवर असताना त्यात पुन्हा लम्पीबाधित गायी नवीपेठ व समाचार चौकात आढळून आले.

पशुपालकांकडून बाधित गायींना मोकाटपणे सोडून देण्यात येते आहे. या लम्पीबाधित गायींमुळे आणखी धोका वाढला आहे. लम्पी हा त्वचेचा आजार आहे. जो विषाणूंमुळे गुरांमध्ये पसरतो. या आजारामुळे जनावरांच्या शरीराला गाठी येतात आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास जनावरांचा मृत्यूही होऊ शकतो. ग्रामीण भागात लम्पी रोगाच्या नियंत्रणासाठी बाधित गावांच्या पाच किलोमीटर क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे.

lampi
Pune Ganeshotsav : सर्वाधिक दणदणाट मंडईत

राज्य शासन यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. संपूर्ण राज्यातील सर्व जनावरांचे बाजार बंद करण्याचे केले आहेत. रोग संसर्गजन्य असून, बाधित एखादी गाय किंवा बैलास डास, गोचीड चावले किंवा मोठ्या माशा चावल्या आणि त्याच दुसऱ्या निरोगी जनावरांना चावल्या तर हा आजार पसरतो.

lampi
Solapur News : रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर

शहरात ठिकठिकाणी दहा-पंधरा गायी एकत्रित मोकाट फिरतात. महापालिका प्रशासन या पशुपालकाला दंड करण्यापलीकडे कोणतीच कारवाई करीत नाही. त्यातच या गायी कोणाच्या मालकीचे आहे, हेदेखील लक्षात येत नसल्याने दंड कोणाला करायचा असाही प्रश्न अनेकदा प्रशासनासमोर असतो.

मोकाट जनावरांमध्येही लम्पीचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून महिन्याभरापूर्वी शहरात मोकाट फिरणाऱ्या शंभर ते सव्वाशे गायींचे लसीकरण केले आहे. शहरात लम्पीबाधित असलेल्या गायींविषयी कोणतीही माहिती नाही. अथवा आम्हाला निदर्शनास आले नाही. जर असे कुठे आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती त्वरित द्यावी.

जगन्नाथ बनसोडे, मंडई विभागप्रमुख.

lampi
Solapur : तात्पुरत्या होर्डिंगसाठी ३०७ जागा निश्चित

यापूर्वी नवीपेठेत लम्पीबाधित गाय आढळून आली होती. त्यानंतर समाचार चौकात दोन लम्पीबाधित गायी आढळून आल्या. गोवंश आणि गोमाता जपली पाहिजे. यासाठी मी स्वत:च्या कारखान्यात या लम्पीबाधित गायीचे उपचार सुरू केले आहेत. या गायींना लसीकरण करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. लसीकरणानंतरही गायीला लम्पी झाला ही बाब गंभीर असून, यामुळे शहरातील इतर जनावरांना धोका निर्माण होऊ शकतो.

जय साळुंखे, माजी परिवहन समिती सभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.