Solapur News : निधी अभावी नामसंकीर्तनचे काम ठप्प

पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने येथील श्री संत तनपुरे महाराज मठाच्या लगत भव्य असे नामसंकीर्तन सभागृह बांधण्यात आले आहे
Solapur News
Solapur NewsSakal
Updated on

पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने येथील श्री संत तनपुरे महाराज मठाच्या लगत भव्य असे नामसंकीर्तन सभागृह बांधण्यात आले आहे. या नामसंकीर्तन सभागृहाचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सजावट, वातानुकूलन, एरिया डेव्हलपमेंट आदी कामे अद्यापही बाकी आहेत. मात्र राज्य शासनाकडून पुढील निधी प्राप्त न झाल्याने सभागृहाचे काम सध्या ठप्प झाले आहे.

मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रयत्नातून तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासबाब म्हणून या नामसंकीर्तन सभागृहास मंजुरी दिली होती. तदनंतर पहिल्या टप्प्यातील निधी प्राप्त झाल्यावर सुमारे १ हजार आसन क्षमतेचे नामसंकीर्तन सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या १ लाख ११ हजार ५८० चौरस फूट जागेमध्ये अंदाजे १ लाख ६४३ चौरस फूट बांधकाम करण्यात आले आहे.

या नामसंकिर्तन सभागृहाची आसन व्यवस्था तळमजला आणि बाल्कनी अशी असून भव्य मंच व्यवस्था, अत्याधुनिक सोईसुविधासह वातानुकुल दालन, ध्वनी व्यवस्था, प्रकाश योजना, कलाकारांसाठी भव्य मंच, मेकअप रुम, दोन लिफ्ट, व्हीआयपी पाहुण्यांसाठी व अपंगांसाठी लिफ्ट, व्हीआयपी पाहुण्यांसाठी रूम आदी सोयी सुविधांचा समावेश आहे. पहिल्या मजल्यावर पार्किंग, वातानुकूलित बहुद्देशीय हॉल, डायनिंग हॉल असणार आहे. तर दुसऱ्या मजल्यावर पाचशे चौरस फुटांची आर्ट गॅलरी कम हॉल आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २७ कोटी रुपये खर्चून संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले आहे.

मुंबई येथील एच.एस.खिलारी कंपनीने अत्याधुनिक सामग्रीने नामसंकीर्तन सभागृहाचे भव्य असे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील निधी राज्य शासनाकडून अद्याप प्राप्त न झाल्याने नामसंकीर्तन सभागृहाचे काम ठप्प झाले आहे.

निधी प्राप्त होताच दगडी संरक्षक भिंत, दगडी प्रवेशद्वार, अंतर्गत विद्युतीकरण, अग्निरोधक यंत्रणा, अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा, परिसरात आकर्षक कारंजे, अंतरंग सिलिंग सजावट, फ्लोअरिंग, अंतर्गत सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते, गार्डनिंग, लँडस्केपिंग आदी कामे हाती घेतली जाणार आहेत. नामसंकीर्तन सभागृहाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर ही देखणी इमारत पंढरीच्या वैभवामध्ये नक्कीच भर टाकणार आहे. "नामसंकीर्तन सभागृहाच्या इमारतीचे सिव्हील वर्क पूर्ण झाले आहे. अंतर्गत सजावट व उर्वरित कामांसाठी लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला आहे. निधी प्राप्त होताच उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे."

- अरविंद माळी, मुख्याधिकारी, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.