Solapur News : शरद पवारांनी अभ्यास करून बोलावे - राधाकृष्ण विखे पाटील

शरद पवार हे माजी केंद्रीय कृषी मंत्री आहेत. त्यांनी कोणतेही विधान करताना वस्तुस्थितीची माहिती घेऊन अभ्यास करत विधान करावे.
Sharad Pawar And RadhaKrishna Vikhe Patil
Sharad Pawar And RadhaKrishna Vikhe Patilesakal
Updated on
Summary

शरद पवार हे माजी केंद्रीय कृषी मंत्री आहेत. त्यांनी कोणतेही विधान करताना वस्तुस्थितीची माहिती घेऊन अभ्यास करत विधान करावे.

सोलापूर - ‘शरद पवार हे माजी केंद्रीय कृषी मंत्री आहेत. त्यांनी कोणतेही विधान करताना वस्तुस्थितीची माहिती घेऊन अभ्यास करत विधान करावे, अशी टीका राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरात केली.

केंद्र सरकार परदेशातून तूप आणि बटर आयात करणार असल्याचे वृत्त वृत्तपत्रांमध्ये आल्यानंतर त्या बातमीचा आधार घेऊन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि संकलन केंद्र अडचणीत येतील, हा निर्णय केंद्र सरकारने बदलावा, असे पत्र केंद्र सरकारला लिहले आहे आणि ट्विटही केले आहे.

या संदर्भात विखे पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘शरद पवार हे पूर्वी केंद्रीय कृषी मंत्री होते. त्यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन, अभ्यास करून बोलले पाहिजे. केंद्र सरकारने बटर आणि तूप आयात करण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही. विचार सुरू आहे, असे सांगितले आहे. लम्पीच्या रोगामुळे दुधाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. मात्र, यामध्ये तूप आयात करण्याचा प्रश्‍न नाही.

राज्यामध्ये ७० टक्के दूध खासगी तर ३० टक्के सरकारी संस्थामध्ये संकलन केले जाते. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. उत्पादक शेतकऱ्यांवर लगेच परिणाम होणार, हे शरद पवार यांचे विधान वास्तवाला धरून नाही. केंद्र सरकार असा निर्णय घेणार असेल तर राज्याच्या वतीने केंद्राला विनंती करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी मागणी करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.